राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांचा विरोध
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती'च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही. वाचा सविस्तर
प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयं; कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या मोठ्या घोषणा
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. याच कार्यक्रमात कामगार मंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयं, प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्र, चौकाचौकात कामगार नाका शेडची उभारणी करण्यार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केलं. वाचा सविस्तर
पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल; ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची सूचना
जागतिक हवामानातील बदल आणि त्यांचे होणारे दुष्पपरिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आपल्याला जरी समाधानकारक वाटत असला तरी या पाण्याचे अधिक काळजीपूर्वक काटेकोर नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही. हवामान तज्ञांनी अलनिनो आणि इतर घटकांमुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण कमी अशी स्थिती दर्शविली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल अशा सूचना राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. वाचा सविस्तर
बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन : देवेंद्र फडणवीस
"बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन सुरु आहे. राज्याची, सरकारची बदनामी करण्याचा काहींचा प्रयत्न असून स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजली जातेय," असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडीची कालची सभा निराश लोकांचा अरण्य रोदन आहे. त्यांची सत्ता गेल्याने ते निराश आहेत, बावचळलेले आहे, त्यांचा तोल गेला आहे. त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. गडचिरोलीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, बारसू रिफायनरी आंदोलनासह विविध विषयांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज सहा तास बंद
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज (2 मे) रोजी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान दुरुस्ती होणार आहे. सुमारे 800 पेक्षा अधिक विमानसेवांना फटका बसण्याची शक्यता आहे. हवाई दलाकडून विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामातील महत्त्वाच्या टप्प्याचे काम आज हाती घेणार आहे. वाचा सविस्तर