Sharad Pawar Annonce Retirement : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सभागृहात जोरदार घोषीत केल्यानंतर शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी  विरोध केला. निर्णय माग घेईपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे.


पवारांसमोर अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. 'महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार' अशा घोषणा देण्यात आल्या. राजीनामा मागे घेण्यासाठी धनंजय मुंडे शरद पवारांच्य पाया पडले. राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. अनेक कार्यकर्ते या वेळी भावूक झाले आहेत. सभगृहात मोठा गोंधळ उडला आहे.


शरद पवारांच्या भोवती मोठी गर्दी जमली. ही गर्दी सावरण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) स्टेजवर गेले. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली आहे. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार म्हणाले,"समिती ठरवेल तो निर्णय पवारांना मान्य असेल. मात्र निर्णय आजच घ्यावा असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला".


काय म्हणाले शरद पवार?


शरद पवार म्हणाले,"राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. संघटनेच्याबाबत पुढं काय करायचं याबाबत मी एक समिती करणार असून यात सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळ पर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो". 


पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणं हे देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी, निर्णय मागे घ्या; जयंत पाटलांना अश्रू अनावर


शरद पवार यांच्या निर्णयानंतर जयंत पाटील भावूक झाले. जयंत पाटलांना अश्रू अनावर झाले. तसेच निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आत्तापर्यंत महाराष्ट्रात आम्ही शरद पवार यांच्यामुळे आहोत. पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणं हे देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी आहे. त्यांनी असा निर्णय कुणालाही मान्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी निर्णय मागे घ्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.


शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय