Gudi padwa 2023 Live Updates : गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह, पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Gudi Padwa 2023 : हिंदू धर्मात गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) या सणाला फार महत्त्व आहे.
LIVE
Background
Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक, असे मानले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार, काही जण या दिवशी सोनं खरेदी करतात, काही नवीन कार घेतात तर काही जण नवीन व्यवसायाला प्राधान्य देतात.
गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करतायत.. प्रत्येकजण आनंदाची ,सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारतायत.तर कुणी पारंपरिक पोषाखात शोभायात्रांमध्ये सहभागी होतायत. ..तसंच आज ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातायत.. या शोभायात्रेमध्ये प्रत्येकजण आनंदाने, अभिमानाने सहभागी होतायत. यासोबतच अनेक सेलिब्रेटीही या शोभायात्रेत सहभागी झालेत... मुंबईसह पुणे,कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय.
गुढी पाडव्याचे महत्व (Importance Of Gudi Padwa 2023)
गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. त्याच वेळी, भारतातील विविध राज्यांमध्ये इतर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुंदर गुढी उभारून, तिची पूजा करतात. असे मानले जाते की, गुढी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
त्याचबरोबर काही लोक या दिवशी कडुलिंबाची पानेही खातात. यामागची धारणा अशी आहे की, यावेळी निसर्गात बदल होत असतो, त्यामुळे कडुलिंबाची कोवळी पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रोगांच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते आणि शरीर आतून मजबूत होते.
सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. याला गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) असेही म्हणतात. यामागे एक वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे. यावेळीशरद ऋतूनंतर वसंत ऋतू सुरु होतो. झाडांना कोरड्या पानांच्या जागी नवीन हिरवी पाने येऊ लागतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळेच सनातन धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरे केले जाते.
Pandharpur : तुळस अर्चन पूजेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद
Pandharpur : आज गुढी पाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर सुरु केलेल्या तुळशी अर्चन पूजेस स्थानिक आणि भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशीच्या सर्व 30 पूजा फुल झाल्या आहेत. आज सकाळी महानैवेद्याच्या वेळेला पहिल्या स्लॉटमधील पहिले 10 कुटुंबीय सकाळी दहा वाजल्यापासून मंदिरात पूजेसाठी जमले होते. विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे या कुटुंबाना बसवून मंदिराच्या गुरूंकडून पूजेस सुरुवात झाली . विष्णू सहस्त्रनाम म्हणत पूजेचा संकल्प सोडण्यात आला . यावेळी मंदिराच्या वतीने तुळशी फुले आणि सर्व पूजेचे साहित्य भाविकांना देण्यात आले होते .
Yavatmal Gudi Padwa: यवतमाळच्या माईंदे चौक येथे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 51 फुटांची गुढी उभारली
Yavatmal Gudi Padwa: यवतमाळच्या माईंदे चौक येथे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 51 फुटांची गुढी उभारण्यात आली. या चौकात 1966 मध्ये शिवसेनेकडू जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीधर मोहोड यांनी शाखा उघडली होती. यावेळी जिल्हावर आले अवकाळी पावसाचा संकट दूर होऊ दे यासाठी शेतकऱ्यांना समर्पित 51 फुटांची गुढी उभारली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी गुढीपाडवा साजरा
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी गुढीपाडवा साजरा केला.
Ajit Pawar Gudi padwa : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उभारली गुढी
Ajit Pawar Gudi padwa : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला. यावेळी अजित पवारांनी सपत्नीक गुढीची पूजा केली.
आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली, गुढीची सपत्नीक पूजा केली.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 22, 2023
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/67JTt74jgh
Girgaon Shobha Yatra : मुंबईच्या गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरूवात, 22 फुटांची गुढी उभारली
Girgaon Shobha Yatra : मुंबईच्या गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातोय. मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर शोभायात्रेत सहभागी झाले आहेत.. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झालीये. 22 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे...