Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा!

Maharashtra Gram Panchayat Elections 2021, Polling on 15 January 2021 LIVE Updates: राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jan 2021 06:55 PM
वर्धा - कारंजा (घाडगे) तालुक्यातील खैरी (पुनर्वसन) येथील नागरिकांचा ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार. मागण्यांची पूर्तता होईस्तोवर यापुढे प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
नंदुरबार - नवापूर तालुक्यातील केळी ग्रामपंचायत मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या पुलावरून प्रवास करत मतदानाचा हक्क बजावावा लागला
जळगाव - ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचा संशयावरून नेरी ग्रामस्थांनी एका व्यक्तीस चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना जामनेरतील नेरी गावात घडली होती.
यवतमाळ : 101 वयाच्या आज्जीने बजावला मतदानाचा हक्क. महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील सखुबाई मारोती जामकर या 101 वयाच्या आज्जीने मतदानाचा हक्क बजावला येथील वार्ड क्रमांक 1 साठी त्यांनी मतदान केले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठा दाभाडी या गावात हृदय विकाराच्या झटक्याने उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे , त्यामुळे मतदान केंद्राच्या बाजूलाच मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ नातेवाईक व समर्थकांवर आली. प्रभाकर शेजुळ (वय 60) असे निधन झालेल्या उमेदवाराचे नाव असून त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होतेय..
कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्ष मतदान होतंय...तर ४७ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत...याच बिनविरोध झालेल्या एका ग्रामपंचायतीनं 'आम्ही मतदान नाही तर रक्तदान करणार' या टॅगलाईन खाली रक्तदान शिबिर आयोजित केलं...कोल्हापूर जिल्ह्यातील पेद्रेवाडी असं या गावचं नाव आहे....ग्रामपंचायत बिनविरोध केल्यानंतर मतदान करण्याची वेळ आली नाही...पण आम्ही रक्तदान करण्याचा निर्णय घेतला....आज गावातील सर्व तरुण मंडळी आणि जुने जाणते नेते यामध्ये सहभागी झालेत...शेकडो तरुणांनी आज गावातच रक्तदान केलं.
दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66 टक्के मतदान झाले आहे.
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234,
• आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,776,
• एकूण प्रभाग- 46,921,
• एकूण जागा- 1,25,709,
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221,
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024,
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197,
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719,
• बिनविरोध होणारे उमेदवार- 26,718,
• निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880,
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील खैरी या पुनर्वसित गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घातला.. येथील एकाही मतदारान मतदानाचा हक्क बजावला नाहीय.. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी नागरिकांनी बहिष्काराचं अस्त्र वापरलं..
वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 61.39टक्के मतदान.
भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. दोन गटात आधी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. यामध्ये काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे लैलास पाटील यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला.  या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याचे समजते. जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
वर्धा -

- दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 61.13 टक्के मतदान

- जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतीसाठी सुरू आहे मतदान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 66 ग्रामपंचायतमध्ये दुपारी 3.30 वा. पर्यंत 63.5 टक्के मतदान
ग्रामपंचायत निवडणूक अपडेट्स -

दुपारी 3.30 वाजेपर्यंत कल्याण तालुक्यात 60.60 टक्के मतदान
,
अंबरनाथ तालुक्यात 74.63 टक्के मतदान
अमरावती ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक,

अमरावती जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत 59.19 टक्के मतदान
भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. दोन गटात आधी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. यामध्ये काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे लैलास पाटील यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला.  या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याचे समजते. जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 40.62 टक्के मतदान. जिल्ह्यात होत आहे 224 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक.
दुपारी 1.30 वाजेपर्यंत कल्याण तालुक्यात 32.07 टक्के मतदान
अंबरनाथ तालुक्यात 63.84 टक्के मतदान
सिंधुदुर्ग -

जिल्ह्यात 66 ग्रामपंचायत मध्ये दुपारी 1.30 वा. पर्यंत 52.58 टक्के मतदान
गडचिरोली- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया संपन्न, गडचिरोली जिल्ह्या हा नक्षलग्रस्त असल्याने सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजेपासून 1.30 वाजेपर्यंत 70.16 टक्के इतकं मतदान झालं असून अंतिम टक्केवारी 80 टक्के इतकं होण्याची शक्यता आहे
नांदेड ग्रामपंचायत अपडेट-
नांदेड जिल्ह्यात 907 ग्रामपंचायतीसाठी 13 लाख 22 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 60 टक्केच्या जवळपास मतदान.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत 35.28 टक्के मतदान झाले असून मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 66 ग्रामपंचायतींमध्ये 494 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. या करता 1087 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
लातूर- दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 48 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान
अकलूज ग्रामपंचायत मध्ये मोहिते विरुद्ध मोहिते संघर्ष शिगेला पोचला असून दोन्ही गटांनी एकमेका विरोधात तक्रारी दिल्या आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस ने अकलूज ग्रामपंचायत निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे तर याउलट जनतेनी ही निवडणूक हाती घेतल्याने यंदा नक्की सत्तातर घडेल असा दावा धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे . ही निवडणूक मोहिते पाटील यांनी प्रतिष्ठेची केल्याने कुटुंबातील सर्व सदस्य मतदान केंद्रांवर फिरत असून विरोधी पॅनल उभे केलेले डॉ धवलसिंह व त्यांचे कुटुंबही अकलूज मध्ये फिरत असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे
परभणी : परभणी जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण 75 हजार 695 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 11.27 इतकी आहे. आज सकाळी 7.30 ते 9.30 या वेळात परभणी तालुक्यात 12 हजार 366 मतदारांनी मतदान केले, याची टक्केवारी 11.46 इतकी आहे. सेलू तालुका 8548 (13.11%), जिंतूर 10 हजार 463 (9.56%), पाथरी 8114 (14.54), मानवत 6604 (12.47), सोनपेठ 5296 (11.20), गंगाखेड 8900 (9.95), पालम 6055 (10.00), पूर्णा 9349 (11.23%) मतदान झाले आहे.
सोलापूर -
तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवेळी भोसले-भिंगारे गटात वाद,


वादातून मतदान केंद्राच्या जवळ दगडफेक,

दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती,


पोलीस घटनास्थळी दाखल,
नांदेड : बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असणाऱ्या भोकर मतदार संघातील मालेगाव ग्रामपंचायत मतदान केंद्रावर सकाळपासून उमेदवारांची वादावादी सुरु आहे. सदर मतदान केंद्र 84 वरील मतदान अधिकारी व्यंग नसणाऱ्या व्यक्तींची कागदोपत्री कोणतीही खातरजमा न करता इतर व्यक्तींकडून मतदान होत असल्याचा आरोप करत उमेदवारांमध्ये भांडणे होताना दिसत आहेत. याविषयीची माहिती निवडणूक विभागास मिळाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा मतदान केंद्रावर दाखल झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक मतदानात दुपारी दोन वाजेपर्यंत 48 टक्के मतदान
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास शांततेत सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांत 11.56 % मतदान झाल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली आहे.
कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणूक अपडेट, सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 36 टक्के मतदान
नंदुरबार : सकाळी अकरा वाजेपर्यंत शहादा तालुक्यात 21 ग्रामपंचायतीसाठी 21 टक्के मतदान पार पडलं. तर नंदुरबार तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठी 20 टक्के मतदान पार पडलं. नवापूर तालुक्यात 11 ग्रामपंचायतींसाठी अकरा वाजेपर्यंत 45 टक्के मतदान झालं आहे.

सोलापूर -

ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी दुर्दैवी घटना,

अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ,

उमेदवार सायबण्णा बिराजदार यांचा पहाटे 4 च्या सुमारास मृत्यू,

बिराजदार उमेदवार असलेल्या संबंधित वार्डाची निवडणूक प्रक्रिया थांबविली
आज होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांच्या प्रसिद्ध राळेगणसिद्धीत सुरेश दगडू पठारे व किसन मारुती पठारे हे मतदारांना साड्या वाटत असताना गुरुवारी सायंकाळी भरारी पथकाने रंगेहात पकडले दोघांना तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासमोर हजर करण्यात आले देवरे आणि शहानिशा केल्यानंतर पठारे विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.परंतु धुळे तालुक्यामध्ये वारंवार मशीन बंद पडत असल्याचा तक्रारी समोर येत आहे. सकाळीच मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावरील मशीन बंद पडले होते. त्यानंतर आता पुन्हा धुळे तालुक्यातील सोनगिर येथील वार्ड क्रमांक पाच येथील एव्हीएम मशीन एक तासापासून बंद पडल्यामुळे मतदारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
धुळे : धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर गेल्या एक तासापासून मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मतदान प्रक्रिया एक तासापासून खोळंबली आहे.
भिवंडीतील 53 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण 56 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून त्यातील तीन ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. सध्या 53 ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात येतं आहे. दिवे, पूर्णा, काल्हेर, वळ याठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. दरम्यान पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राबाहेर सीसीटीव्ही तसेच पोलीस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जात आहे. या निवडणुकीमध्ये स्थानिक दिग्गजांच्या प्रतिष्ठान पणाला लागल्या आहेत. भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींमधील 466 सदस्य निवडीकरता ही मतदान प्रक्रिया होत असून 1082 उमेदवार रिंगणात आहेत.
पुणे जिल्ह्यात आज 650 ग्रामपंचायतसाठी मतदान होत आहे. 4904 जागांसाठी अकरा हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उरुळी कांचन ग्रामपंचायतकडे पाहिली जाते. पुणे शहराला लागून या ग्रामपंचायतची हद्द आहे. या ग्रामपंचायतच्या हद्दीत मोठमोठ्या इमारती मोठमोठे उद्योगधंदे असल्यामुळे एक वेगळे महत्व या ग्रामपंचायत निवडणुकीला आले आहे. आज सकाळपासून या गावात मतदानाची लगबग सुरु आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. नक्षलग्रस्त दुर्गम भागात मतदारांचा मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत आहे. जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. यासाठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. नक्षलग्रस्त दुर्गम भागात मतदारांचा मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत आहे. जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. यासाठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. गावकीचं राजकारण आणि गावाच्या विकासाला दिशा देणारी ही निवडणूक असल्याने तरुणांचाही मतदानासाठी सहभाग दिसून येत आहे. जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुुरुवात झाली आहे. 389 अधिकारी आणि 9 हजार 760 कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील 1952 मतदान केंद्रावर मतदान होत असून 4229 जागांसाठी 11 हजार 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 44 संवेदनशील तर 8 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. 6 लाख 11 हजार 654 स्त्री तर 6 लाख 72 हजार 453 पुरुष असे एकूण 12 लाख 84 हजार 109 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या 27 पैकी गोरेगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. विविध ग्रामपंचायतीतील 68 उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. अंबरनाथमधल्या 26 ग्रामपंचायतीमध्ये 173 जागांवर निवडणूका होणार असून 247 उमेदवार रिंगणात आहेत. 78 मतदान केंद्रावर आज मतदान होणार आहे. आज सकाळपासूनच नेवाळी ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदारांनी कोरोनाचे नियमांचे पालन केल्याचे दिसून आलं. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीपैकी वरप ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून विविध ग्रामपंचायतीमधील 44 उमेदवार बिनविरोध तर 20 ग्रामपंचायतीमधील 167 जागांवर निवडणुका होणार आहेत त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच ग्रामीण भागांत मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यांत 64 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
वाशिम : जिल्ह्यात 163 ग्रामपंचायत निवडणुकी होऊ घातल्या आहेत. त्यापैकी 11 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या. तसेच इतर ग्रामपंचायातींमधील 27 प्रभाग बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे 152 ग्रामपंचायतींमधील 486 प्रभागांमध्ये 539 मतदान केंद्रांवर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. यातून 1233 ग्रामपंचायत सदस्य निवडले जातील.
बुलढाणा : जिल्ह्यातिल नांदुरा तालुक्यातील सात सदस्यीय ग्राम पंचयतीच्या निवडणुकीसाठी मतदान आज पार पडत आहे. येथील मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात आज खूप थंडी असूनही, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापुर्वीच मतदार मतदान केंद्रावर रांगा लावून उभे आहेत. जिल्ह्यात आज 498 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींपैकी 53 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 925 ग्रामपंचायतिची निवडणूक प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यात एकूण 2832 मतदान केंद्र असून 6682 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.जिल्ह्यातील 14 लाख 18 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावून आपले ग्रामपंचायत सदस्य निवडून देणार आहेत.
गोंदीया : गोंदीया जिल्ह्यात आज 189 ग्रापपंचायतींसाठी मतदान होत आहे. नक्षलग्रस्थ भागांतील मतदान केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
गावागावात राजकीय वर्चस्वासाठी लढाई, राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान, सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या


ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमदनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362.
मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल.
मतदान प्रक्रियेसाठी गुरुवारी दुपारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली होती.

राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.

राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला. उद्या शुक्रवार, 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
धारूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १५ जानेवारी रोजी ४ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांची नियुक्ती करूनही गैरहजर राहणाऱ्या चार शिक्षकावर आदेशाचा अवमान केला म्हणून धारूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates:  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आज थांबला आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.


 


मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल.


 


कोरोनाबाधित रुग्णांना मतदानाची विशेष सुविधा


 


कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.


 


कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, शपथा घेऊन मतदान करण्यास दबाव


 


मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलवण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले.


 


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.