Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजनगरच्या पैठण (Paithan) तालुक्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवनाथ शामराव जगधने (30) आणि शीतल दोडवे-उघडे (28) अशी मृतांची नावे आहेत. मृत नवनाथ हा जन्मठेपेची शिक्षा कारागृहात भोगत होता, एक महिन्याच्या पॅरोल सुट्टीवर तो आला होता. पॅरोल सुट्टी संपल्याने नवनाथने 28 मार्च रोजी पुन्हा कारागृहात जाणे गरजेचे होते. पण तो गेला नाही. शुक्रवारी (दि. 28) रोजी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी तो गेला होता. पण, नातेवाइकांनी समजूत घालून घरी परत आणले होते. शनिवारी रात्री घराच्या टेरेसवर झोपला असताना विषारी औषध पिऊन तो गावाजवळील मक्याच्या शेतात गेला होता. त्याचासह शितलचा मृतदेह आढळून आल्याने पैठणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातपूर येथील नवनाथ शामराव जगधने आणि शितल दोडवे-उघडे हे दोघे पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नवनाथ शामराव जगधने याच्यावर अंबड जि. जालना येथील पोलिस स्टेशन येथे 6 वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. सध्या तो एक महिन्याच्या पॅरेल सुट्टीवर आला होता. त्याला 28 मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी जाण्यासाठी जायचे होते.
'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यानं उचललं टोकाचं पाऊल
नवनाथ जगधने हा शुक्रवारी दि. 28 रोजी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी नातेवाईकांनी समजूत घालून त्याला घरी परत आणले होते. त्यानंतर शनिवारी रात्री घराच्या छतावर झोपला असता त्याने विषारी औषध प्राशन केले आणि तेथून निघून गेला. गावाजवळील मक्याच्या शेतात सोमवारी दि. 31 रोजी त्याचा मृतदेह आढळून आला. तर शितलचे लग्न दुसरीकडे झाले असताना तिचे प्रेम कातपूर येथील नवनाथ बरोबर झाले. नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असताना तिच्या 6 वर्षीय मुलाचा खून त्यांनी केला होता. याप्रकरणी नवनाथ शिक्षा भोगत होता. तर शितलला निर्देश मुक्त करण्यात आले होते. संभाजीनगर येथे ती भाड्याने राहत होती. काही दिवसांपूर्वी कातपुर येथे ती आली होती. सोमवारी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. दोघांच्या आत्महत्येचे मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा