मुंबई: राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.
राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.
सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.
उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी
- दंगल घडवून तरी दाखवा, मग बघा...; किशोरी पेडणेकरांचे भाजपला आव्हान, मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचे नाव देण्याची मागणी
- Nitesh Rane: माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना शासन होईल; नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संतोष परब यांची प्रतिक्रिया