Palghar Latest News :  चिमुकल्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी पोहोचविण्यास नकार देणाऱ्या दोन कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तात्काळ निलंबित केल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय बोदाडे यांनी एबीपी माझाला दिली आहे. आतिष गुरव  आणि रवी मुकणे या दोन कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना निलंबित करण्यात आला असून अजून चार जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.


पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी  वय 6 वर्ष  ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर आई-वडिलांनी उपचारासाठी त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात चिमुकल्याला दाखल केलं. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉक्टरांनी जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार कुटीर रुग्णलयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9:00 वाजता कुटीर रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू झाला. 


परंतु आर्थिक चनचनीत अडकलेल्या या कुटूंबाला मृतदेह आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा ठाकला? यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता पैसे देणार असाल तरच गाडी मिळेल. अशी तंबीच रुग्ण चालकांनी कुटूंबियांना दिली, असल्याचे मृत्यू अजयचे वडील युवराज पारधी यांनी सांगितले. तसेच पैसे नसतील तर पायीपायी मृत्युदेह घेऊन जा, असेही त्यांना यावेळी सांगण्यात आले. परंतु पैसे द्यायला नसल्याने हताश होऊन थंडीत  कुडकुडत  35 ते 40 किमी अंतरावर बाईकवर  मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत येथे आले.   ही दुर्दैवी घटना प्रशासनाच्या कारभार चीड आणणारी असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha