एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्याला फर्लो, पॅरोल नाही!
मुंबई : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला यापुढे फर्लो किंवा पॅरोल मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पल्लवी पूरकायस्थ दोषी पळून गेल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
फक्त बलात्कारातील दोषीच नाही तर दरोडेखोर, ड्रग कायद्याखालील दोषी, खून आणि आजन्म जन्मठेप शिक्षा सुनवलेल्या दोषींनाही पॅरोल किंवा फर्लो मिळणार नाही. राज्य सरकारने अद्याप यासंदर्भातील परिपत्रक जारी केलेलं नाही. मात्र ज्यादिवशी परिपत्रक जारी होईल, तेव्हापासून हा निर्णय लागू होईल.
अॅडव्होकेट पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र शिक्षा भोगत असलेला सज्जाद मुघल पॅरोलवर बाहेर आला आणि त्यानंतर फरार झाला.
नाशिक जेलमधून अनेक दोषींनी पॅरोलवर असताना पलायान केलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत 21 दोषींनी पॅरोलवर असताना पलायन केलं आहे. त्यामुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील दोषीबाबत अशी घटना होऊ नये, यासाठी त्यांना पॅरोल न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement