Ganesh Visarjan Miravnuk LIVE Updates : सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन

Ganesh Visarjan 2024 : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज संपूर्ण राज्यात गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे.

प्रज्वल ढगे Last Updated: 17 Sep 2024 02:25 PM
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन 


बाप्पाला निरोप देताना सुशीलकुमार शिंदेचे नातू शिखर पहारिया देखील उपस्थित 


यंदाच्या वर्षी शिंदे परिवाराने सोलापुरात गणेशोत्सव साजरा केला 


दहा दिवस सुशीलकुमार शिंदेच्या गणेशोत्सवसाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील हजेरी लावली होती 


आज प्रणिती शिंदे आणि शिखर पहारिया यांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आला 


यावेळी शिंदे कुटुंबीयसह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते

Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या रामकुंड परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी

दहा दिवसानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मूर्ति संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत त्यासोबत शहरातील विविध सामाजिक संस्थांनी देखील मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला नाशिककर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. रामकुंड परिसरामध्ये नाशिक महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अग्निशमन विभागाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील दत्ताजीराव काशीद तरुण मंडळाकडून मिरवणुकीत महिलांना मान

कोल्हापुरात बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई अवतरली आहे... अंबाबाईचा सजीव देखावा कोल्हापुरातील दत्ताजीराव काशीद तरुण मंडळाने साकारला आहे... या मंडळाने बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा सर्व मान महिलांना दिला आहे... विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला लेझीम खेळत आहेत.

वसईच्या माणिकपूर पोलिसांनी घेतला आपल्या बाप्पाचा निरोप 

वसई : आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेशभक्त सज्ज झाले आहेत. वसईत माणिकपूर पोलीस ठाण्याच्या ११ दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना माणिकपूर पोलीसांनी भव्य मिरवणूक काढली होती. महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारीनी फेटा आणि एकच रंगाचे कपडे परिधान करुन, आपल्या बाप्पाला वाजत नाचत निरोप दिला.  बाप्पाला निरोप दिल्यानंतर लगेच सर्व पोलीस कर्मचारी आपला गणवेश परिधान करुन, उशिरा रात्री पर्यंत विसर्जन स्थळी तैनात असतील.

नाशिक विसर्जन मिरवणुकीला सुरवात, साधारण 3000 पोलीस रस्त्यावर तैनात 

नाशिक विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली


साधारण 3000 पोलीस रस्त्यावर तैनात  

पुण्यात कोणत्या गणपतीच्या मिरवणुकीला किती वाजता सुरुवात झाली?

पुणे : गणपती विसर्जन मिरवणूक 10:30 वाजता सुरू झाली



मानाचा पहिला - कसबा गणपती


10:30 - मिरवणुकीची सुरुवात


11:10 - बेलबाग चौकात 


मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी


10:40 - मिरवणुकीला सुरुवात


12:00 -बेलबाग चौक


मानाचा चौथा - गुरुजी तालीम


11:10 - मिरवणुकीला सुरुवात


मानाचा चौथा - तुळशीबाग


11:50 - मिरवणुकीला सुरुवात


मानाचा पाचवा - केसरीवाडा

गिरगांवच्या राजाचं विसर्जन, अत्यंत उत्साहात दिला निरोप

ज्या गिरगांव परिसरातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्या गणेश मंडळाने वाजत गाजत, ढोल काळ्यांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाचा निरोप दिला.. गिरगांवचाचा राजा या गणेश मंडळाची सुरुवात 1928 रोजी बाळ गंगाधर ठिळकांनी केली.. शाडूच्या माती ने बनवण्यात येणारी या भव्य दिव्य मुर्तीचं कौतुक पंतप्रधान नेरेंद्र मोदींने आपल्या मन की बात या कार्यक्रमात ही केला.. भक्तांनी या गणपतीला अत्यंत उत्साह ने निरोप दिला. याचा आढावा घेतला आहे

नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक 12 वाजेपर्यंत सुरू होणार

नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक 12 वाजेपर्यंत सुरू होईल. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरवात होणार आहे.  सुरवातिला मानाचे पाच गणपती मार्गस्थ होतील, मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय..

संभाजीनगरात संस्थान गणपतीच्या आरतीनंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

छत्रपती संभाजी नगरचा आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती होते आहे. वर्षानुवर्षाचे परंपरा आहे की संस्थान गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर कुठलाही मंडळ विसर्जन मिरवणूक सुरू करत नाही. सर्वपक्षीय नेते रथ ओढत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करतात..

नागपुरात पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप, तुळशीबाग परिसरातून मिरवणुकीला सुरुवात

दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज नागपुरात ही लाडक्या बाप्पाना पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत निरोप दिला जात आहे...


नागपुरचा राजाची विसर्जन मिरवणूक आज सकाळी तुळशीबाग परिसरातून सुरु झाली....


शहरातील वेगवेगळ्या भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक दुपारी 3 वाजता नागपुर पासून 20 किलोमीटर अंतरावर कोराडीच्या तलावावर पोहोचेल आणि त्या ठिकाणी श्री गणरायांच्या मूर्तीचा विधिवत विसर्जन केला जाईल....


तुळशीबागेत गेले 29 वर्ष नागपूरचा राजाची स्थापना केली जात असून 10 दिवसात लाखो नागपूरकर या मूर्तीचे दर्शन घेतात....


विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फ़ा मोठी गर्दी होते....


आज ही लाडक्या बाप्पा ना निरोप देण्यासाठी नागपूरकर रस्त्यावर जमले आहेत  

पुणे मानाचा चौथा तुळशी बाग गणपती मंडईकडे मार्गस्थ

पुणे मानाचा चौथा तुळशी बाग गणपती मंडईकडे मार्गस्थ होत आहे 


मंडईतून गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार 


 मिरवणुकीतच्या अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारावादन असणार 


 याखेरीज शिवमुद्रा स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी वाद्य पथके सहभागी 'होणार 


 स्वरूपवर्धिनीची मल्लखांबची प्रात्यक्षिक विशेष आकर्षण असणार 


 लकडी पुलावरील मेट्रो ब्रिगमुळे उंचीला मर्यादा असल्याने हायड्रॉलिकचा वापर करणार आह

Ganeshotsav 2024 : गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन 10 दिवसांनीच का करावं लागतं? पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य

Ganeshotsav 2024 : गणेश चतुर्दशीपासून सुरु झालेला गणेसोत्सव 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो. या दरम्यान घरी लाडक्या बाप्पाचं आगमन केलं जातं. सुख-समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. एक प्रकारे गणपतीची सेवा केली जाते. मात्र, जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र, लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. अनेकदा लहान मुलांना प्रश्नही पडतो की देवबाप्पा आपल्या घरी येतात मग त्यांचं विसर्जन का करतात? याच संदर्भात आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 


सविस्तर माहितीसाठी लिंक दिलेली आहे. Ganeshotsav 2024 : गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन 10 दिवसांनीच का करावं लागतं? पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य

गणेशाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी सज्ज, घरगुती बाप्पाच्या विसर्जनास सुरुवात

 आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून, जुहू चौपाटी येथे देखील घरगुती बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. जुई चौपाटी परिसरात बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.  

Kolhapur Ganesh Visarjan : कोल्हापुरातील तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग

कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये महिलांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे...या विसर्जन मिरवणुकीमध्ये एकाच रंगाच्या साड्या परिधान करून महिला सहभागी झाल्या आहेत... विसर्जन मिरवणुकीमध्ये फुगड्या, पारंपरिक गाणी म्हणत आपल्या लाडक्या बापाला निरोप दिला जातो.. 

Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक 12 वाजेच्या सुमारास सुरू होणार

नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक 12 वाजेच्या सुमारास सुरू होणार आहे


21 चित्र रथ यात सहभागी झाले असून सुरवातीला मानाचे गणपती 5 गणपती असणार आहेत


कार्यकर्ते आता जमायला सुरवात होत असून मिरवणुकीची तयारी सुरू झाली आहे, पोलिसांचा बंदोबस्त ही तैनात केला जात आहे

सोलापुरात भक्तीपूर्ण वातावरणात घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात 

सोलापुरात भक्तीपूर्ण वातावरणात घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात 


10 दिवस लाडक्या गणेशाची सेवा केल्यानंतर आज सोलापुरातील नागरिक देतायत बाप्पाला निरोप 


सोलापूर महापालिकेतर्फे 14 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था तर 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र 


शहरात 1143 सार्वजनिक मंडळानी यंदा गणेश प्रतिष्ठापना केली होती 


संध्याकाळी 4 नंतर या सर्वजनिक मंडळाच्या मिरवणूकीला सुरुवात होईल 


191 मंडळ या मिरवणूकामध्ये सहभागी होणार असून पोलिसांचा चोख बंदोबस्त या वेळी तैनात असणार आहे


सोलापुरातील श्री सिद्देश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट येथून आढावा घेतलाय आफताब शेख यांनी 

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल. 

कसबा गणपतीसमोर प्रभात बँडचे वादन, 90 वर्षांची परंपरा जपली

पुण्यातील मिरवणुकीत जसं ढोल ताशाला महत्त्व आहे तेवढच महत्त्व मानाच्या पहिल्या कसबा गणपती समोर वादन करणाऱ्या प्रभात बँडला देखील आहे. ९० वर्षांची परंपरा जपत हा बँड यंदाही मिरवणुकीत सहभागी होऊन वादन करत आहे.

भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याचा सल्ला

भिवंडीतील टिळक चौक ब्राह्मणआळी परिसरातील श्री वरद विनायक मित्र मंडळाने यावर्षी तब्बल 22 फूट उंच गणेश मूर्ती मंडळातच साकारली आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्ती विसर्जन मार्गावर अतिक्रमण आहे. तसेच टोरंट पावरच्या केबल्स आणि विद्युत तारा यामुळे मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, मूर्ती 22 फूट उंच असल्याची कल्पना असतानाही महानगरपालिका, पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन मार्गावर योग्य व्यवस्था केली नाही. अतिक्रमण हटवले गेले नाही, ज्यामुळे मंडळासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून पोलिसांनी मंडळाला मार्ग बदलून विसर्जन घाटापर्यंत नेण्याचा किंवा जागेवरच विसर्जन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीची मिरवणूक नेहमीच्या मार्गानेच काढण्याचा हट्ट धरला आहे. मंडळाच्या मते, या अडथळ्यांसाठी महानगरपालिका आणि विद्युत पुरवठा कंपनी जबाबदार आहेत.

पुण्यातील दिखमदार मिरवणुकीची तयारी सुरु, बाप्पला निरोप देण्यासाठी सगळे सज्ज

पुण्यातील दिखमदार मिरवणुकीची तयारी सुरु


लक्ष्मी रस्ता गजबजला आहे.


बाप्पला निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत

Kolhapur Ganesh Visarjan : कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी तयारी

कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाचा बाप्पा विसर्जनासाठी बाहेर पडत आहे...ॉॉया बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतरच कोल्हापुरातील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करून विसर्जना मिरवणुकीला सुरुवात होत आहे... ढोल ताशाच्या गजरात खासबाग मैदानापासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक मिरजकर तिकटी मार्गे महाद्वार रोड आणि पुढे इराणी खानीकडे जाते... यंदा कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन इराणी खाणीकडे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत...

भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीची तयारी सुरू

भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीची तयारि सुरू


शंखनाद करण्यात येत आहे


केशव शंख पथकाकडून हे शंखनाद  

Ganesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन

Ganesh Visarjan 2024 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 7 सप्टेंबर 2024 पासून देशभरात गणेशोत्सव सुरू झाला. दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणेशाची पूजा-अर्चना झाल्यानंतर अखेर अनंत चतुर्दशीला वेळ आलीये बाप्पाला भरलेल्या डोळ्यांनी निरोप देण्याची. आज गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. यंदा गणेश विसर्जन मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच आज होणार आहे. या वर्षी गणपतीच्या निरोपाचा शुभ मुहूर्त कोणता आहे?  पंचागानुसार, जाणून घ्या गणपती विसर्जनाची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत.


सविस्तर लिंक येथे वाचा : Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य

पुण्यातील दिमाखदार गणेश वीसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू

पुण्यातील दिमाखदार गणेश वीसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली आहे पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौकात बाप्पाल निरोप देण्यासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात येत आहेत. सोशल मीडिया सायबर क्राइम या थीम वर रांगोळी काढून सामाजिक संदेश दिला जाणार आहे.

टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूनच पुण्यातील गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील ऐतिहासिक मंडईच्या समोर असलेलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूनच पुण्यातील गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे हस्ते नारळ फोडून या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी टिळकांच्या पुतळ्याला देखील सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

मुंबईचा राजा असलेल्या गणेशगल्लीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला लवकरच सुरुवात

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. मुंबईतल्या मानाच्या मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशगल्लीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी सुरुवात होते. त्यानंतर इतर मानाचे गणपती हे प्रस्थान करतात. थोड्याच वेळात गणेशगल्ली येथे गणपतींच्या आरतीला सुरूवात होईल

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण

मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९ः३० दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान, लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडताना दिसेल. 

दगडूशेठ हलवाई गणपती चार वाजता मिरवणूक, विसर्जनसाठी रथ सज्ज!

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी श्री उमांगमजल रथ सज्ज झालाय. बरोबर चार वाजता दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी निघेल आणि आठच्या दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्याचा मानस आहे.. यंदाच्या वर्षी 30 टक्के गर्दी जास्त असल्याचे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले. महेश सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी

पार्श्वभूमी

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मुंबई, पणे या प्रमुख शहरासह राज्यातील घरोघरी गणरायचं मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं होतं. आज (17 सप्टेंबर) गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. राज्यभरात गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे. राज्यातील याच गणेश विसर्जनाची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.