एक्स्प्लोर

LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण

Maharashtra LPG Supply News : राज्यात इंधन आणि LPG तुटवड्याच्या अफवांदरम्यान अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : राज्यात इंधन आणि LPG तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. भारत सरकारकडे सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या शहरांमध्ये पीएनजीची सुविधा आहे आणि तरीही त्यासाठी अर्ज केला नाही तर त्या ठिकाणचा एलपीजी सिलेंडर तीन महिन्यांमध्ये बंद होऊ शकतो असं भुजबळ म्हणाले. 

युद्धामुळे जागतिक स्तरावर परिणाम होत असला तरी भारतातील इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. रशिया आणि व्हेनेझुएलाकडून इंधन पुरवठा सुरू असून भारताची जहाजं नियमितपणे सोडली जात आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

Fuel Supply Status : इंधन पुरवठा सुरळीत

राज्यात कुठल्याही प्रकारचा इंधन किंवा गॅस तुटवडा नाही. भारत सरकारकडे पुरेसा साठा असून तुटवड्याच्या परिस्थितीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवा जास्त प्रमाणात पसरत असल्याचं भुजबळांनी सांगितलं.

LPG Rumors : सिलेंडर बंद होणार?

सिलेंडर बंद होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

PNG Pipeline Rule : पीएनजी लाईनबाबत नवा नियम

पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज करणं गरजेचं असणार आहे. जर पीएनजी लाईनचं काम पूर्ण झालं आणि अर्ज केला नसेल, तर तीन महिन्यानंतर LPG बंद होऊ शकतो. मात्र, ज्यांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे आणि तरीही पीएनजी लाईन बसवली गेली नाही, त्यांचा LPG सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हा नियम फक्त ज्या शहरांमध्ये पीएनजीचं काम सुरू आहे तिथेच लागू असेल, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं. 

Gas Supply Increase : व्यावसायिक गॅस पुरवठा वाढ

व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच LPG साठ्यातही मोठी वाढ करण्यात आली असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले. 

Ration Stock Update : रेशन धान्य मुबलक

राज्यात धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना तीन महिन्यांचं रेशन एकाचवेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. साठवणुकीसाठी जागा कमी पडत असल्यामुळे तीन महिन्यांचं धान्य एकत्रित नेलं तरी काही अडचण नाही असं भुजबळांनी म्हटलं. तसेच केरोसीनही उपलब्ध करून देण्यात येणार असून यासंदर्भात न्यायालयालाही माहिती देण्यात आली आहे, असंही ते म्हणाले. 

Government Assurance : सरकारचं आश्वासन

पीएनजी लाईनसाठी वेगळी परवानगी लागणार नाही. अर्ज केल्यानंतर ती सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असेल. ज्या भागात पीएनजी लाईन पोहोचली नाही, तिथे LPG सेवा सुरूच राहणार आहे. तसेच राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget