Maharashtra Covid-19 Updates : राज्यात गेल्या 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद तर आठ जणांचा मृत्यू
Maharashtra Covid-19 Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट होत असून सोमवारी केवळ आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याचं दिसून येतंय. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 768 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 64,76,450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील 96,042 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1033 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,678 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
मुंबईत केवळ एक मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 230 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 204 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा काळ आता 2187 दिवस इतका झाला असून कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे. मुंबई शहरात एकूण 2845 इतके सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 97 टक्के इतका झाला आहे.
देशातील स्थिती
सध्या देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे.
संबंधित बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात 538 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, 249 मृत्यू
- केंद्राकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही, 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचं नियोजन: राजेश टोपे
- धक्कादायक! एकाच शाळेतील 28 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचं वातावरण