Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 18 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jan 2022 04:56 PM
परभणी जिल्ह्यात 203 नवीन कोरोना बाधितांची नोंद

परभणी कोरोना अपडेट


परभणी- जिल्ह्यात 24 तासात 203 नवीन कोरोना बाधितांची भर


2201 तपासण्यांत आढळले 203 नवीन रुग्ण 


53 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज 


सध्या जिल्ह्यातील एकुण 920 रुग्णांवर उपचार सुरू

पुणे जिल्ह्यात 11 हजार 748 नवे कोरोनाबाधित

पुणे जिल्ह्यात आज एका दिवसांत नवे 11 हजार 748 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात 24 तासात 203 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

परभणी जिल्ह्यात 24 तासात 203 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 384 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

नांदेड जिल्ह्यात आज 451कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नांदेड जिल्ह्यात आज  451कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

अकोल्यात आज 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

अकोल्यात आज 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1766 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

चंद्रपुरात आज 352 कोरोनाबाधितांची नोंद

चंद्रपूर : कोरोना अपडेट 18-1-2022


आजचे कोरोना बाधित -352


कालचे कोरोना बाधित - 179


आजचे कोरोनामुक्त - 98


ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह - 1833


आजचे बाधित मृत्यू - 1

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या चंद्रपूरमध्ये 1833 सक्रिय रुग्ण आहेत.

सोलापूर जिल्ह्यात आज 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

सोलापूर जिल्ह्यात आज 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पंढरपूरमध्ये 106 रुग्णांची नोंद झाली आहे. 

पंढरपूर मध्ये आज कोरोनाने शंभरी ओलांडली, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पंढरपूर मध्ये

पंढरपूर मध्ये आज कोरोनाने शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पंढरपूर मध्ये सापडले आहेत. 

पार्श्वभूमी

मुंबई : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत राज्याला आज काहीसा दिलासा मिळाला असून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय. 
 
राज्यात 112 ओमायक्रॉनबाधितांची नोंद


राज्यात आज  112 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 959 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 24 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे.  सध्या राज्यात 22 लाख 64 हजार 217 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,21,24,824   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 मुंबईतील रुग्णसंख्येत घट, 5 हजार 956 नवे कोरोनाबाधित


मागील 24 तासांत 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर नव्या बाधितांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोनामुक्त झाले असून एकूण 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.   मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 5 हजार 556 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आतापर्यंत 9 लाख 35 हजार 934 मुंबईकरांनी कोरोनावर मात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 93 टक्क्यांवर पोहचला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.