Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 17 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
धुळे जिल्ह्यात कोरोनाने 300 आकडा पार केला आहे. आज जिल्ह्यात 377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 3959 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3067 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 519288 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 35073 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 15630 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात 24 तासात 104 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 770 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 56 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
जिल्ह्यामध्ये एकूण 804 तपासण्या करण्यात आल्या
13 जण कोरोनामुक्त
सध्या 259 रूग्णांवर उपचार सुरू
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 56 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात अकोल्यात 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1597 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत 1145 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात आज 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 201 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 179 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या चंद्रपूरमध्ये 1580 सक्रिय रुग्ण आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मागील काही दिवसांपासून घट पाहायला मिळत आहे. पण राज्याच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. राज्यात आजही 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात 40368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 68,00,900 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.3% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,19,74,335 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 72,11,810 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,98,414 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2921 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आठ ओमायक्रॉनचे रुग्ण -
आज राज्यात 8 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 1738 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. 932 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
मुंबईकरांना मोठा दिलासा! नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तिप्पट -
मुंबईतील कोरोना (Corona) महामारीमुळे वाढणारे रुग्ण आज काही प्रमाणात कमी आढळले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेतील ही रुग्णसंख्या दिलासादायक असल्याने नागरिक आणि पालिका प्रशासनाला दिला मिळाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 7 हजार 895 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 457 झाली आहे. तर 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 92 टक्क्यांवर पोहचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -