Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 January 2022 : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! राज्यात शुक्रवारी 43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात शुक्रवारी 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात शुक्रवारी 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 238 नव्या रुग्णांची नोंद
राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 238 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे.
राज्यात शुक्रवारी सापडेलल्या रुग्णांपैकी 197 रुग्ण हे पुण्यातील आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, अकोल्यातील एक रुग्ण सापडला आहे. राज्यात आज आढळलेल्या १६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
पुण्यात 5,705 नवे रुग्ण
परभणी- जिल्ह्यात 24 तासात 114 नवीन रुग्णांची भर
परभणी- जिल्ह्यात 24 तासात 114 नवीन रुग्णांची भर
3064 तपासण्यात 114 रुग्ण आढळले
उपचार सुरू असलेल्या 17 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
सध्या जिल्ह्यातील एकुण 615 रुग्णांवर उपचार सुरू
धुळे जिल्ह्यात आज 204 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
धुळे जिल्ह्यात आज 204 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या धुळ्यात 810 सक्रिय रुग्ण आहेत.
परभणी जिल्ह्यात 24 तासात 114 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
परभणी जिल्ह्यात 24 तासात 114 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या परभणीत 615 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 37 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 37 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या हिंगोलीत 149 सक्रिय रुग्ण आहेत.