Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.
assam : आसाममध्ये आज 66 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 453 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
karnataka : कर्नाटकात आज 1405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईत आज 235 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) काहीशी अधिक आहे, कारण सोमवारी 192 नव्या बाधितांचीच नोंद झाली होती. पण आज मुंबईत एकाही रुग्णाचा मृच्यू न झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 235 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 446 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आज 2831 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8395 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Kerala : केरळात आज 11,776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Parbhani : परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 36 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरता असून आजतर नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 11 हजार 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या 36 हजार 447 ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 76,61,077 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.66 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आत 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. याशिवाय राज्यात आज 8 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. हे आठही रुग्ण मुंबईत आढळले आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्येतही घट
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -