Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 1 February 2022 : राज्यासह देशातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2022 04:44 PM
राज्यात आज 14,372 रुग्णांची नोंद

राज्यात आज 14,372 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 30,093 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 94 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 

अकोल्यात 24 तासांत आढळले 166 नवे कोरोना रूग्ण

आज दिवसभरात अकोल्यात आढळलेत 166 नवे कोरोना रूग्ण. सध्या जिल्ह्यात 1379 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू. आज दिवसभरात एका रूग्णाचा कोरोनाने मृत्यू. आतापर्यंत 11567 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू. आज होम आयसोलेशनमधील 300 जण झालेत कोरोनामुक्त. 


अकोला : गेल्या पाच दिवसांतील आढळलेले कोरोना रूग्ण :


28 जानेवारी : 291
29 जानेवारी : 192
30 जानेवारी : 153
31 जानेवारी : 055
27 फेब्रूवारी : 166


पाच दिवसांत एकूण रूग्ण : 857

बुलढाणा जिल्ह्यात आज 628 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

बुलढाणा जिल्ह्यात आज 628 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3315 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

पुण्यात आज 2075 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5271 रुग्ण कोरोनामुक्त

पुण्यात आज 2075 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5271 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत मंगळवारी 803 नवे कोरोनाबाधित, तर 1 हजार 800 जण कोरोनामुक्त

 मुंबईत मंगळवारी 803 नवे कोरोनाबाधित, तर 1 हजार 800 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

वाशिम जिल्ह्यात आज 94 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद

वाशिम जिल्ह्यात आज  94 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1002 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोना विषाणूचे 15,140 नवीन रुग्ण आढळून आले, हे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 7304 कमी आहेत. तर, आणखी 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 77 लाख 21 हजार 109 वर पोहोचली आहे, तर राज्यात 1 लाख 42 हजार 611 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.


महाराष्ट्रात सध्या 2,07,350 सक्रिय कोरोना रुग्ण


महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 35,453 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 73,67,259 लोक बरे झाले आहेत. तर, महाराष्ट्रात सध्या 2,07,350 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. याशिवाय सोमवारी ओमायक्रॉन प्रकाराच्या नवीन 91 रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनंतर राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या एकूण 3221 झाली असून त्यापैकी 1,682 रुग्ण बरे झाले आहेत.


पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण
पुण्यात गेल्या 24 तासात 3762 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 7953 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 14 जणांचा मृत्यू झाला. तर, पुण्यात एकुण सक्रिय रुग्णांची संख्या 59 हजार 204 वर पोहोचली आहे. त्यापैकी 56 हजार 887 प्रकरणे होम आयसोलेटेड आहेत. तसेच आतापर्यंत 19 हजार 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत कोरोनाबाधितांमध्ये घट


मुंबईत गेल्या 24 तासात 960 रुग्ण आढळले आहेत. यात लक्षणे नसलेली 835 रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 47 हजार 590 वर पोहोचली आहे. सोमवारी नोंदवलेल्या रुग्णांपैकी 106 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 30 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पालिकेने सांगितले की, मुंबईत सध्या 2215 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी 973 ऑक्सिजनवर आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.