मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 536 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 329 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
आज एकाही कोरोनाबाधितांचा मृत्यू नाही
राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही, राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,34,439 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 2568 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 2568 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1797 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 308 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
भारतात कोरोनाचे 2710 नवीन रूग्णांची नोंद
देशातील कोरोना संसर्गात चढ-उतार पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा किंचित वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची देशातील नवी आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 710 नवे रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोनारुग्ण विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 7 हजार 177 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात 15 हजार 814 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोना रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
राज्याचा साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 1.59 टक्के आहे. तर मुंबई, पुण्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळत आहे. ही वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री त्यासोबतच राज्य शासनाकडून केलं जात आहे.
संबंधित बातम्या