Nashik News : पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना उघडकीस येतात. मात्र अनेकदा संपर्क होऊ न शकल्याने अनेकदा रुग्ण दगावतो. यासाठी नाशिक जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकत्र येऊन व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून मार्गदर्शन करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतील. तसेच हे गोल्डन हावर्स किती महत्वाचे असतात, हे नागरिकांचाही लक्षात येईल. यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या संकल्पनेतून सर्पदंश उपचार व्यवस्थापन यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळापूर्व नियोजनासाठी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात काम करणार्‍या पथकातील 84 डॉक्टरांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.                                                                                                                                                                                                                                                                                   नाशिक जिल्ह्यातील 70 टक्के नागरिक हा ग्रामीण भागात वास्तव्य करतो. अनेक काम करताना, शेतात राबतांना सर्पदंशाच्या घटना उघडकीस येतात. अशावेळी दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना काय करावे समजत नाही, बहुतांश लोक दवाखान्यात नेण्यापेक्षा बाबाकडे नेतात, अनेकदा रस्ता नसणाऱ्या भागात असलेल्या रुग्णांना जीव गमवावा लागतो, वेळेत न पोहचल्याने, संपर्क होऊ न शकल्याने अनेकदा रुग्ण दगावतात. अशावेळी काय करावे, याबाबत समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच साप चावल्यानंतर रुग्णाला कोठे घेऊन जायचे? याविषयी समाजामध्ये चांगल्याप्रकारे जनजागृती करणे गरजेचे आहे. 


गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे?
दरम्यान जुन ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाचे रुग्ण आढळतात. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी अत्यंत कमी सर्पदंश झालेले रुग्ण आढळले होते आणि त्यातून अनेक मृत्यू होतात. सर्पदंश झाल्यावर रुग्ण खूप घाबरलेला असतो, त्याला विषारी बिनविषारी सापाविषयी माहिती नसते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याबाबतचे व्यवस्थापन करताना रुग्णाचे गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे असतात हे ओळखून उपचार करणे गरजेचे असते. यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. शाळेतल्या मुलांच्या सहभाग पण यामध्ये चांगल्याप्रकारे होऊ शकतो 


सर्पदंश उपचाराचे व्यवस्थापन
सर्पदंश उपचाराचे व्यवस्थापन करताना रुग्णाला सरकारी दवाखान्यातच उपचार करावेत याबाबत माहिती देण्यात यावी. तसेच उपचार करणारे डॉक्टर्स व त्यांचे अनुभव ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी समजून घेऊन याबाबतच्या उपचाराबद्दल व्यवस्थापन करावे. तसेच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थापन करावे, उपचार करणार्‍यांचा डॉक्टरांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. तसेच त्यामुळे अनेकांचे आपल्याला प्राण वाचवता येईल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 


लीना बनसोड यांनी यावेळी आश्वासित केले की जिल्ह्यामध्ये सर्पदंशावरील औषधे पुरवठा कमी पडणार नाही. त्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जाईल, तसेच खाजगी रुग्णालयात औषध उपलब्ध होईल. जिल्ह्यामध्ये सर्पदंश नंतर होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून यामध्ये डॉक्टरांचे महत्त्वाचे योगदान आहे.