Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 535 कोरोनाबाधितांची नोंद 963 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाच्या 535 नव्या रुग्णांची भर तर दहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 535 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज दहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 963 रुग्णे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 454 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 454 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 5665 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4733 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 932 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज दहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 16 हजार 674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के आहे. सध्या राज्यात 27,025 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 82 लाख 14 हजार 557 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासात देशात 5 हजार 921 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात देशात 5 हजार 921 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 289 जणांचा गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. काल देशात 6 हजार 396 रुग्णांची नोंद झाली होती. तर 201 जणांचा कोरोनामुले काल मृत्यू झाला होता. रुग्ण संख्येत दररोज घट होताना दिसत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 13 हजार 450 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर आता सक्रिय रुग्णांची संख्या 63 हजार 878 वर आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात 5 लाख 14 हजार 878 जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 78 हजार 731 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या