(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज चार कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4189 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 978 रुग्णांची भर पडली आहे.
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज चार कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,07,438 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.85 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 23996 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 23996 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 9710 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5184 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 18,819 नवे कोरोनाबाधित
देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नाहीय. कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 819 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या 1 लाख 4 हजार 555 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 555 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे 14 हजार 506 नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 30 जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे पोहोचली आहे.