Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 132 रुग्णांची नोंद तर सहा जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 132 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 803 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 132 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज सहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज सहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 96, 66, 245 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 803 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 803 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 305 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 99 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
गेल्या 24 तासांत देशात 1,150 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 150 नवीन रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 365 आहे. देशातील कोरोनाबळींची संख्या 5 लाख 21 हजार 656 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.76 टक्के असून ते 4 कोटी 30 लाख 34 हजार 217 इतकी वाढली आहे. सक्रिय कोरोना प्रकरणात 24 तासांमध्ये 147 रुग्णांची घट झाली आहे. कोरोनाचा दैनिक सकारात्मकता दर 0.24 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 0.23 टक्के आहे. देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत.