(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट, सक्रिय रुग्णसंख्याही कमी
Corona Update : बुधवारी राज्यात केवळ 119 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने कमी येत असल्याचं चित्र आहे. बुधवारी राज्यात केवळ 119 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये 138 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. हे चित्र दिलासादायक असंच आहे.
आज दोन जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली असून बुधवारी केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे.
तसेच राज्यामध्ये एकूण 77,25,120 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आतापर्यंत 7,93,47,580 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच राज्यामध्ये एकूण 77,25,120 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आतापर्यंत 7,93,47,580 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील स्थिती
मुंबईत आज नवे 38 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 57 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 292 झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
देशातील स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,233 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 31 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 1876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सध्या देशात केवळ 14 हजार 704 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 4.24 कोटींवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- दहशतवादी बनलेल्या पत्रकाराचा सुरक्षा दलांकडून खात्मा; श्रीनगरमधील घटना
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, सैन्यासाठी खरेदी करणार 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर; जाणून घ्या किंमत
- Narayan Rane : राणेंच्या खात्यावर मोदींची मेहेरनजर, तब्बल 6,000 कोटी रुपयांची मंजुरी