एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा! कोरोना रूग्ण संख्येत लक्षणीय घट, एकही मृत्यू नाही

Maharashtra Corona Update : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज फक्त 180 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज फक्त 180 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. कालच्या तुलनेत आज नोंद झालेल्या रूग्णांची संख्या देखील खूपच कमी आहे. काल राज्यात 379 रूग्णांची नोंद झाली होती. शिवाय आज 357 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत होता. परंतु, मागील एक आठवड्यापासून पुन्हा नव्या रूग्णांच्या संख्येत घट सुरू झाली. ही घट कायम राहत आज नव्या रूग्णांची संख्या 200 च्या खाली आली. गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोनाचा सामना करत असताना ही आकडेवारी खूपच दिलासादयक आहे. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 357 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,71,346  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 14 टक्के एवढे झाले आहे.

एकही मृत्यू नाही (Maharashtra Corona Death)  

रूग्ण संख्या कमी होण्यासह आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.

सक्रिय रूग्ण (Maharashtra Corona Update)  
राज्यातील रूग्ण संख्या घटत आहे. त्याचबरोबर सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 
2739 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 826 करोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर पुण्यापाठोपाठ मुंबईत 714 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. 

देशातील स्थिती  (India Corona Update) 

राज्यासह देशातील कोरोना रूग्णांमध्ये देखील मोठी घट झाली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशात 3011 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 364 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. पण आज 10 कोरोनाबळींची संख्या वाढली आहे. काल 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या 28 वर पोहोचली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget