Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 326 कोरोना रुग्णांची नोंद, तर 251 जणांची कोरोनावर मात
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात आज 326 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
Maharashtra Corona Update : शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात आज 326 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे.
राज्यात काल 307 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर शुक्रवारी राज्यात 311 रूग्णांची नोंद झाली होती. आज राज्यात 251 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 77,33,043 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.10 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 1903 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशातील स्थिती
भारतात पुन्हा एकदा दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2226 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 65 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. कालच्या पेक्षा आज कोरोवा रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. काल देशात 2 हजार 323 नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
आज (22 मे) जाहीर झालेल्या आकडेवारीत मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी 21 मे रोजी कोरोनाचे एकूण 2 हजार 323 नवीन रुग्ण आढळून आले होते आणि 25 जणांचा मृत्यू झाला होता. आज 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 65 जणांचा मृ्त्यू झाला आहे.
दरम्यान, देशातील सक्रिय प्रकरणांमध्ये आता थोडीशी घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांवरुन आता 14 हजार 955 वर आली आहे. जी सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास 2 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.