Maharashtra Corona Update : राज्यात आज नवी रुग्णसंख्या 300 पार ; तर 252 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Coronavirus : राज्यात आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 307 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Coronvirus) रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात आज रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केला आहे. आज नव्या 307 रुग्णांची भर पडली आहे तर 252 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,32,81 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज 1605 सक्रिय रुग्ण
राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1605 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 1002 सक्रिय रुग्ण हे मुंबईतअसून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 305 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्याची राजधानी मुंबईचा विचार करता आज मुंबईत 194 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
देशात 1829 नवे कोरोनाबाधित
देशातील कोरोना महामारीच्या संसर्गात सतत चढउतार पाहायला मिळत आहे. एक दिवस आधी नव्या कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट आढळल्यानंतर आज पुन्हा नव्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. देशात 1 हजार 829 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी 1569 नवीन कोरोना रुग्ण आणि 19 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनारुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत याबाबत माहिती दिली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 647 वर पोहोचली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणामुळे भारताता कोरोनावर मात करण्यात मोठी मदत झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 549 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 87 हजार 259 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.75 टक्क्यांवर पोहोचलं आहे.