(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 2971 कोरोना रूग्णांची नोंद, पाच बाधितांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : शनिवारी राज्यात 2971 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत आज कमी रूग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 3249 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती.
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवासंपासून घट होत आहे. आज राज्यात 2971 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत आज कमी रूग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 3249 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती.
आज राज्यात 3515 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत 78,10,953 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97. 85 टक्के झाले आहे. सध्या 23447 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
पाच रूग्णांचा मृत्यू
राज्यात आज पाच करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 85 टक्के एवढा आहे.
देशातील रूग्ण संख्येत वाढ
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 17 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 17,092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 14684 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, नव्या आकडेवारीनुसार, 1,09,568 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, काल (शुक्रवारी) 1 जुलै रोजी कोरोनाच्या 17,070 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कालच्या तुलनेत आजची वाढ 0.1 टक्क्यांनी जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार, देशातील पाच राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
देशातील 'या' 5 राज्यांत सर्वाधिक रुग्ण
सध्या सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांत तिथे 3,904 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, काल दिवसभरात राज्यात 3249 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तामिळनाडू या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 1739, कर्नाटकात 1073 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये या पाच राज्यांचा वाटा 72.25 टक्के आहे. केरळमध्ये 22.84 टक्के रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.