Maharashtra Corona Omicron Lockdown Updates : संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलं होतं. मंत्रिमंडळाची ती बैठक नुकतीच संपली. सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कठोर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. अशातच राज्यातील निर्बंध कसे असू शकतात, यासंदर्भातील काही निर्बंध माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, फॅन्सी मास्क वापरण्याच्या संदर्भात निर्बंध येण्याची शक्यता आहे. तसेच सौम्स लक्षणं असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात यावं. ज्यांना गंभीर लक्षण आहेत त्यांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्यात यावा, तसेच रुग्णांची कॉन्टक्ट ट्रेस पासिंग जलद गतीने करण्यात यावी, यांसारखे निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
कसे असू शकतात नवीन निर्बंध?
- राज्यात विकेंड लॉकडाउन होण्याची दाट शक्यता
- शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद पाळला जाऊ शकतो
- शनिवार आणि रविवारी पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि चौपाट्या बंद ठेवण्याची शक्यता
- रात्री संचारबंदी लावण्याची शक्यता
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. काल (मंगळवारी) राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Corona Restriction : मुंबईची चिंता वाढली; दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, लवकरच लॉकडाऊन?
- Mumbai Corona Update : रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, पण लक्षणं नसलेल्यांची संख्या अधिक, पालिकेची रुग्णव्यवस्था सज्ज
- ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर
- ...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
- Coronavirus Omicron Variant : लहान मुलांना देखील ओमायक्रॉनचा धोका? पाहा काय म्हणाले तज्ज्ञ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह