Maharashtra Corona Omicron lockdown updates:  संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपली आहे. सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. 


आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे. आज बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती मुख्यमंत्री यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे.  टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरेनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.  उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत.


राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.   कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.  राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. काल (मंगळवारी) राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह