Maharashtra Corona LIVE Updates | लोणावळ्यातील एकविरा देवीची उद्या 19 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द
Maharashtra Covid 19 Cases LIVE Updates : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. राज्यातील संचारबंदी आणि कोरोना संसर्गासंबंधित सर्व अपडेट्स एकाच क्लिकवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील एकविरा देवीची उद्या 19 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द. मात्र गडावर रिती रिवाजाप्रमाणे होणार धार्मिक विधी. आई एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबियांची कुलदेवता तर आगरी आणि कोळी समाजाची कुलस्वामिनी आहे. चैत्र सप्तमीला होणारी यात्रा आणि पालखी मिरवणूक सोहळा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. या महिन्यात होणारे पुढील काही सोहळे ही रद्द होणार. मंदिर समितीचा निर्णय.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 596 कोरोना रुग्णांची नोंद, आज 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील 14 आणि इतर जिल्ह्यातील 8 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या पोहचली 56572 वर
ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत.
चंद्रपूर : उपचाराविना तडफडून कोरोना रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात (छोटा बस स्टँड) मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील घटना, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील संतापजनक घटना, गोविंदा निकेश्वर (50) असं मृतकाचे नाव, या रुग्णाला काल संध्याकाळी आंभोरा (ता. कुही, जि. नागपूर) येथून उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे आणले होते, मात्र कुठेच बेड न मिळाल्याने त्या रुग्णाने ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतला आणि तिथेच सकाळी त्याचा उपचाराविना मृत्यू झाला
हिंगोली : सध्या सर्वत्रच कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यातच हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. मागच्या एका महिन्यात गिरगावात तब्बल ३५० पेक्षा जास्त रुग्ण आढळले असुन १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या इथले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० % असुन प्रशासन या गावावर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलीय.
पालघर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत असून काही भागात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण टाळे बंदीचा निर्णय घेतला आहे. वाडा तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ समजले जाणारे कुडूस शहरा मध्ये सर्व नागरिक, व्यापारी, दुकानदार यांनी संपूर्ण टाळे बंदचा निर्णय घेतला असून संपूर्ण बाजारपेठेसह मंदिर, मशिद आणि इतर धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद ठेवले आहेत त्यामुळे या भागात सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय.
कोरोना पासून बचावासाठी सर्वत्र लसीकरण होत असताना समाजातील प्रत्येक घटकांना लसीकरण व्हाव या करीता वाशीम च्या जिल्हा कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून 45 वर्षावरील सर्व कैद्यांचे लसीकरण आज करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने कैद्याच्या लसीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर कारागृह अधीक्षक सोमनाथ पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांचे
समुपदेशन करण्याची जबाबदारी बालरोग तज्ञ डॉ.हरिष बाहेती यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार वारंवार कारागृहाला भेट देऊन डॉ. बाहेती यांनी कैद्यांना मार्गदर्शन केलं व 45 वर्षावरील 35 कैदी बांधवांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
उद्या सोमवार 19 एप्रिलपासून ते 30 एप्रिल पर्यंत किराणा, भाजीपाला, भाजीमंडी, बेकरी, मिठाई घर सारखे अत्यावश्यक सेवा असणारे आस्थापना/दुकान हे सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंतच चालू राहणार आहेत. तर मेडिकल स्टोअर अथवा 24 तास सुरु राहणार आहेत. सदर वेळेनंतर फक्त होम डिलिव्हरीसाठीच मुभा असणार आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाही करणार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश दिले आहेत.
बीडमध्ये आज जिल्हाधिकारी यांनी काढलेले नविन आदेशात किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी या दुकानांना सकाळी सात ते 11:00 पर्यंत सुट दिली आहे. यासह केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायंकाळी पाच ते सात पर्यंत विक्री करण्यात येणार आहे. या नियमांची अंमलबजावणी ही उद्या पासून म्हणजे 19/4/2021 पासून लागू होणार आहेत.
एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 47 लाख 88 हजार 109
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 28 लाख 9 हजार 643
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 18 लाख 1 हजार 316
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 77 हजार 150
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 डोस
नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे 1 हजार 501 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1,38,423 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 234,692 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत 15 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
जालना - परिस्थिती बघून संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.. ब्रेक द चेनचा आपण धाडसानं निर्णय घेतला आहे.. मात्र या संचारबंदीतही नागरिक रस्त्यावर फिरताना बघायला मिळत आहेत.. पंधरा दिवसांच्या या संचारबंदीची परिस्थिती तपासणार आणि नंतर संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचं टोपे यांनी म्हंटलंय..
निर्यात केले जाणारे रेमडेसिवीर साठे जप्त करण्याचे राज्य सरकारचे आदेश,
केंद्राने निर्यातीवर बंदी लादल्यानंतर ही अनेक ठिकाणी साठा पडून आहे,
हा साठा महाराष्ट्रातला देण्याची मागणी राज्य सरकाने केली होती,
मात्र तो साठा महाराष्ट्राला देऊ नये असा केंद्र सरकारचा दबाव असल्याचा महाराष्ट्र सरकारचा आरोप,
त्यानंतर महाराष्ट्रात रेमडीसिविरचा साठा जप्त करण्याचे राज्य सरकारचा एफडीएला आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही. उद्धव ठाकरे यांनी पतंप्रधानांना कॉल केला होता. परंतु बैठकीत व्यस्त असल्याने सध्या बातचीत होऊ शकली नाही. आज संध्याकाळी दोघांमध्ये संभाषण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने दिली.
सोलापूर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याची कारवाई. जवळपास 70 ते 80 लोकांना ताब्यात घेऊन केली दंडात्मक कारवाई. सकाळी मॉर्निंग वॉक आणि नंतर इतर कारणांनी बाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई
अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिर्डीत कोरोना आढावा बैठक घेतली असून साईबाबा संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलची केली पाहणी. संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांसाठी 150 बेडची व्यवस्था आहे तर दुसऱ्या रुग्णालयात 300 बेड्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 100 बेड्स डायलेसिस , ह्दयरोग तसेच इतर अतिमहत्वाच्या उपचारासाठी राखीव आहेत.
कोरोना मृतांचं प्रमाण अधिक असल्यामुळं, ब्राझीलमध्ये महिलांना शक्य असल्यास ग्रभधारणा पुढे ढकलण्याचा सल्ला.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली. मात्र यात अनेक आस्थापनांना मुभा असल्याने मोठी गर्दी होत होती. त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशांनंतर एक आदेश काढून जिल्ह्यात आजपासून 22 एप्रिलपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा दिली आहे. त्यामुळे किराणा दुकान, भाजी विक्री, फळ बाजार, बेकरी, रस्त्यावरही खाद्य पदार्थ विक्री बंद असणार आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा देणारेच शासकीय कार्यालय सुरु ठेवून इतर सर्व कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. या संचारबंदीची कडक अंमलबजावणी स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरुन करत आहेत.
ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोंडले, सटाणा तालुक्यातील उत्राने गावातील घटना. उत्राने गावात आज आयोजित केला होता ग्रामस्थां साठी लसीकरणाचा प्रोग्राम. 3-4 ग्रामस्थांची नोंदी झाल्यावर साईट बंद पडल्याने झाला गोंधळ. जायखेडा आरोग्य केंद्रात ग्रामस्थांना घेऊन यावे असे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर,बाहेर जाण्यास उत्राने ग्रामस्थांचा नकार.
अत्यावश्यक कारणे सांगून रस्त्यावर नागरिकांची होणारी गर्दी पाहता सोलापूर पालिका प्रशासनाचा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरात आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 1 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता किराणा दुकाने, भाजी मंडई आणि इतर सर्व खाद्यपदार्थांच्या दुकानांना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावर विनाकारण असणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येतेय. शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत.
शुक्रवारी सातारा जिल्ह्यात 1543 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले तर 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 80,462 कोरोनाबाधित आहेत तर आतापर्यंत 2043 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 66,126 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून सध्या रुग्णालयात 12,293 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाशिमच्या गोवर्धना गावात काल एकाच दिवशी कोरोनाचे 207 नवीन रुग्ण आढळले. आठ हजार लोकसंख्येच्या गावात गेल्या सात दिवसात 537 रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 14 एप्रिल रोजी एकाच दिवशी 220 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासन खडबडून जागं झालं असून गावात आरोग्य पथक दाखल झाल आहे. संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर केला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावातील अनेक नागरिकांनी शेतात मुक्काम ठोकला आहे.
राज्यात तासाला 12 मृत्यू होत आहेत. तर तासाला 2 हजार रूग्ण सापडत आहेत. गेल्या आठ दिवसांत म्हणजेच 9 ते 16 एप्रिल या कालावधीत राज्यात 4 लाख 15 हजार 44 नवीन रुग्ण वाढले आहेत. या कालावधीत राज्याने 2 हजार 222 नागरिकांना गमावले आहे. या 8 दिवसांत राज्यात 1 लाख 3,431 अॅक्टिव्ह रुग्णांची भर पडली आहे. या हिशेबाने राज्यात 8 दिवसांत तासाला 12 मृत्यू तर 2161 नवे रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी राज्यात 63,729 नवीन कोरोना रुग्ण, तर 398 मृत्यू झाले. दिवसभरात 45,335 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबईतील गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात देखील ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात स्थलांतरित केले आहे.
ऑक्सिजनअभावी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोशल मीडियावरुन केला जात आहे. परंतु आरोग्य प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. तर आपण या प्रकाराची माहिती घेत असून त्यानंतर बोलू असं जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं. दरम्यान जिल्हा प्रशासन सकाळी 10 वाजता यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असून परिपत्रकही जारी करणार आहे.
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात काल 29 कोरोनाबाधितांचा रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांचा आकडा समोर आलं. तर ऑक्सिजनअभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहे. तर आज मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार देखील या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकरी कार्यालयात आढावा घेणार आहे. तर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात 7500 जणांना कोरोनाची लागण झाली असून याच दोन आठवड्यात 121 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील विविध रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिमेत असलेल्या भाभा रुग्णालयातील 33 रुग्णांना काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. अशीच परिस्थिती बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्येही होती. याठिकाणी 31 रुग्ण होते. मशीनवर ऑक्सिजन संपल्याची नोंद मागील दोन दिवसांपासून येत होती. यासोबतच बोरिवली इथल्या भगवती रुग्णालयात देखील अशीच परिस्थिती होती. काल दुपारी 15 आणि रात्री 27 जणांना विविध ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 6 जणांना कंदरपाडा जम्बो सेंटर, 23 जणांना दहिसर कोविड सेंटर आणि 11 जणांना शताब्दी रुग्णालयत पाठवण्यात आलं आहे. अजूनही 49 जण भगवती रुग्णालयात उपचार घेत आहेत. जर ऑक्सिजनचा पुरवठा नाही झाला तर यांना देखील हलवण्यात येईल.
मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आजही भाजी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. आजही सोशल डिस्टन्सिंग दिसलं नाही. मात्र आज भाजी मार्केटमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि जे दुकानदार किंवा ग्राहक नियम मोडत आहेत त्यांच्यावर आता थेट कारवाई सुरु आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर मार्केटमधील गर्दी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी, ट्रेनमधून प्रवास अशा कारणांमुळे रुग्णांची संख्या आटोक्या येण्याऐवजी ती वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी (16 एप्रिल) सर्वाधिक 63 हजार 729 रुग्णांचे निदान झाले तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे.
राज्यात काल 398 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युंची नोंद झाली असून राज्यातील मृत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होम क्वॉरन्टीन आहेत तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात कालपर्यंत एकूण 6,38,034 ॲक्टिव्ह रुग्ण होते.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल 8803 रुग्णांची नोंद झाली. तर ठाणे मंडळात 17,635 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपा अंतर्गत 5437 नवीन रुग्णांची तर पिंपरी चिंचवड महापालिकेत 2526 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात 883 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. काल जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका दिवसात तब्बल 1500 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर
राज्यातच नाही तर देशात सध्या दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वेगाने वाढत आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचा एक फॅक्टर समोर आलाय तो म्हणजे होम आयसोलेट असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात यायला नको. असं असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरत असल्याने तेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -