Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा सैल, राज्यात आज 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 839 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 86 हजार 059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 839 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (2), धुळे (2), जालना (40), परभणी (72), हिंगोली (15), नांदेड (08), अकोला (22), वाशिम (06), बुलढाणा (23), नागपूर (99), यवतमाळ (09), वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 33 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,088 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 93,37, 713 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,62, 514(11.06 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 520 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,571 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर गेला आहे.
देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 20 हजार 799 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 180 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशातील 26 हजार 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महत्वाचं म्हणजे देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली असून ती 0.78 टक्के इतकी कमी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक म्हणजे 97.89 इतकं झालं आहे. त्या आधी, शनिवारी देशात 22 हजार 842 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 244 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 90.79 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
