मुंबई : राज्यात आज 1975 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update)  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1904  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,08,195 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 11856 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11856 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4243  इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 2343   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात नवे 16561 कोरोनाबाधित (Coronavirus Cases Today in India)


 देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. दिल्लीमध्ये वाढता संसर्ग पाहता पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेनं आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे. देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.44 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात 18 हजार 53 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 35 लाख 73 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 23 हजार 535 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.


संबंधित बातम्या :