India at 2047 : जगभरात कोरोना विषाणूचा (Covid-19) शिरकाव झाल्याने अनेकांचे नुकसान झाले. प्रत्येकजण या महामारीचा सामना करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. याच कोरोना विषाणूचे आणखी प्रकार जगभरात प्रचंड वेगाने पसरू लागले. यामध्येच या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी भारतात उच्च प्रतीच्या लस औषध निर्मितीत वाढ झाली. यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांचं फार मोठं योगदान आहे. 


कोरोना काळानंतर साथीच्या रोगांवरील औषधांवर सुद्धा उच्च दर्जाच्या चाचण्यांवर भर देण्यात आला. विविध आजारांवर चाचण्या करण्याच्या बाततीत भारताचा क्रमांक अव्वल स्थानावर आहे.    


औषधांच्या चाचण्यांसाठी भारत हे सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण


तज्ज्ञांच्या मते, 2019 पासून अमेरिकेच्या बरोबरीने भारतसुद्धा एक मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे.कोरोना काळातील रूग्णांची वाढती संख्या, कुशल वैद्यकीय डॉक्टर्स आणि कमी पैशांतील औषधांच्या रूग्णसेवेमुळे जागतिक स्तरावर देखील भारताचा एक मजबूत देश म्हणून उल्लेख केला जातो. 


या संदर्भात पुष्पवती सिंघानिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे (पीएसआरआय) संचालक डॉ. दीपक शुक्ला म्हणाले की, "औषधांच्या चाचण्यांसाठी भारत हे सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे. याचं कारण असं की भारतात सर्वाधिक मोठे औषध उद्योग आहेत. जितका मोठा तुमचा फार्मास्युटिकल उद्योग मोठा असेल, तितत्या अधिक क्लिनिकल चाचण्या होणार आहेत,"अशी माहिती त्यांनी एबीपी लाईव्हशी बोलताना दिली.


आर्थिक सर्व्हेक्षण 2020-21 नुसार, भारतीय फार्मास्युटिकल मार्केट 2030 पर्यंत सध्याच्या $44 अब्ज वरून $130 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ते 12.3 टक्क्यांच्या CAGR ने वाढत आहे, हे इतर कोणत्याही उद्योग समूहापेक्षा जास्त आहे. 


भारतात 87 जागतिक क्लिनिकल चाचण्यांची नोंद


पॅरेक्सेल, यूएस स्थित क्लिनिकल ट्रायल ऑर्गनायझेशन (सीआरओ) येथे भारताचे व्यवस्थापकीय संचालक संजय व्यास यांनी सांगितले की, भारताची 1.2 अब्ज लोकसंख्या, विषयातील कौशल्य आणि प्रशिक्षित इंग्रजी भाषिक अन्वेषक या कारणास्तव रूग्णांचा वैविध्यपूर्ण समूह इतर योगदान देत आहे. 


क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्री इंडिया (CTRI) नुसार, भारताने 2021 मध्ये 100 हून अधिक जागतिक क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली. हा आकडा 2013 नंतर सर्वाधिक आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या  आजाराने ग्रस्त असतानाही, भारताने 87 जागतिक क्लिनिकल चाचण्या नोंदवल्या. 2019 मध्ये 95 क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या, तर 2018 मध्ये 76 आणि 2017 मध्ये 71 चाचण्या झाल्या.


2019 मध्ये भारताने नवीन औषध आणि क्लिनिकल चाचण्या (NDCT) नियम लागू केल्यानंतर अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे, ज्याचा उद्देश देशातील क्लिनिकल संशोधनाला चालना देणे आणि भारतीय लोकसंख्येसाठी नवीन औषधांची जलद सुलभता निर्माण करणे असा आहे. 


या संदर्भात, डॉ. गणेश दिवेकर, उपाध्यक्ष (क्लिनिकल ऑपरेशन्स), SIRO Clinpharm, भारतातील सर्वात जुन्या क्लिनिकल संशोधन संस्थांपैकी एक म्हणाले की, क्लिनिकल चाचणीची मान्यता आणि पुनरावलोकन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अंदाज करण्यायोग्य झाली आहे. ते म्हणाले, "ICMR ने रोग विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे देखील आणली आहेत. जी उपचार आणि क्लिनिकल चाचण्यांच्या दृष्टीकोनातून खूप उपयुक्त आहेत,".


पॅरेक्सेलचे संजय व्यास म्हणाले की, आजचे नियम हे यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) किंवा युरोपियन मेडिसिन एजन्सी (ईएमए) च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या बरोबरीने आहेत. पुढे बोलताना ते असे म्हणाले की, "2000 मध्ये एक वेळ आली जेव्हा काही स्थानिक प्रदाते आचारसंहितेचे पालन करत नसल्यामुळे क्लिनिकल चाचण्यांमध्ये भारताने अनेक संधी गमावल्या. रूग्णांची भरती ही समस्या बनली आणि नियम पूर्णपणे भिन्न बनल्यामुळे अनेक कंपन्या निघून गेल्या." मात्र, 2019 मध्ये DCGI ने आणलेल्या नियमांमुळे केवळ रूग्णांना, फार्मा कंपन्यांनाच नव्हे तर सेवा पुरवठादारांना देखील याचा फायदा झाला आहे. 


2021 नंतर देशात मोठ्या प्रमाणात क्लिनिकल चाचण्या


2020 मध्ये जेव्हा भारतात कोरोनाचा शिरकाव झाला झाला त्यावेळी मात्र, क्लिनिकल चाचण्या जवळपास संपुष्टातच आल्या होत्या. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने साथीच्या रोगांवर उपचार आणि लसींची तातडीची गरज निर्माण झाली. याचाच परिणाम म्हणजे 2021 नंतर देशात मोठ्या प्रमाणात क्लिनिकल चाचण्या केल्या गेल्या. "अचानक प्रत्येकजण प्लेसबो म्हणजे काय, क्लिनिकल ट्रायल काय आहे, एपिडेमिओलॉजी काय आहे याबद्दल बोलत होते. कोरोनानंतर भारतात क्लिनिकल चाचण्यांबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली," असे व्यास म्हणाले.


पीएसआरआयचे डॉ. शुक्ला म्हणाले की, कोविड-19 दरम्यान लस चाचणी आणि प्रक्रिया भारतात सर्वात वेगवान झाली आहे. "यामुळे भारतीय फार्मा उद्योगाची क्लिनिकल चाचण्या अतिशय जलद आणि सर्वात नैतिक पद्धतीने करण्याची क्षमता प्रस्थापित केली आहे. यामुळे लस औषध निर्मितीत भारत अग्रेसर ठरला आहे."


"भारतात, 80 टक्के आरोग्य क्षेत्र खाजगी आहे. खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक व्यावसायिकदृष्ट्या केंद्रित आहेत, त्यांचा शैक्षणिक आणि संशोधनाकडे फारसा कल नाही. सध्या, बहुतेक क्लिनिकल चाचण्या आणि संशोधन कार्य अशा संस्थांद्वारे केले जाते. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, पीजीआय चंडीगढ, एम्स. परंतु त्यांची संख्या इतकी कमी आहे की, ते देशातील संशोधन कार्याच्या 1 टक्के देखील बनत नाहीत," असे शुक्ला म्हणाले.


क्लिनिकल चाचण्यांच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण क्षेत्र


भारतात क्लिनिकल चाचण्या सध्या विविध क्षेत्रात चालू आहेत, ज्यामध्ये ऑन्कोलॉजी आणि सार्वजनिक आरोग्य समस्यांवर सर्वाधिक अभ्यास केले जात आहेत. SIRO Clinpharm नावीन्यपूर्ण क्षेत्र म्हणून ऑन्कोलॉजी आणि इम्यूनोलॉजीवर लक्ष केंद्रित करत आहे. कारण या रोगांवर अद्याप अपेक्षित उपचार पर्याय नाहीत .


क्लिनिकल चाचण्यांचा बाजार जागतिक स्तरावर $80 अब्ज एवढा आहे, पॅरेक्सेलचे संजय व्यास यांना वाटते की वैद्यकीय संशोधनाच्या नेतृत्वाखालील आरोग्यसेवा प्रगतीसाठी भारतासाठी एक पॉवरहाऊस बनण्याची ही एक मोठी संधी आहे. "एक काळ असा होता जेव्हा भारत नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी 'बॅक ऑफिस' म्हणून ओळखला जात असे. परंतु, भारत आता तांत्रिकदृष्ट्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये आघाडीवर आहे." असे पीएसआरआयचे डॉ. शुक्ला म्हणाले.