मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे.  राज्यात आज 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. आज मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 38 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 


राज्यात काल 8,753 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,385 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आजपर्यंत 58,45,315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 153 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,17,575 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


Mumbai Pune Corona Update : मुंबईत आज 575 तर पुण्यात 344 रुग्णांची नोंद, मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 752 दिवसांवर


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 575 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा काही दिवसांपासून रोजचा हजाराच्या आता येत असल्याचं चित्र आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 575 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत  6,97,991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,297 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 752 दिवसांवर गेला आहे. 


पुणे शहरात आज नव्याने 344 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


पुणे शहरात आज नव्याने 344 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 416 इतकी झाली आहे.शहरातील 283 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 68 हजार 008 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 606 इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 731 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 87 हजार 874 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 802 रुग्णांपैकी 291 रुग्ण गंभीर तर 432 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.