Maharashtra Corona Cases : रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज, 15 जिल्हे आणि शहरात एकही मृत्यू नाही
Maharashtra Corona Cases : राज्यात आज 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात आज 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात आज एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
15 जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद
सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 9 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर शहर, चंद्रपूर जिल्हा, परभणी शहर, हिंगोली, सोलापूर शहर, नंदूरबार, धुळे शहर, धुळे जिल्हा, अहमदनगर शहर, भिवंडी शहर, उल्हासनगर शहरात एकाही मृत्यूची नोंद आजच्या सरकारी आकडेवारीत नाही. तर नवी मुंबई शहर, रायगड जिल्हा, मालेगाव शहर, जळगाव शहर, सांगली शहर, जालना, लातूर शहर, नांदेड शहर, नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया जिल्हा या ठिकाणी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 700 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 700 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,83,382 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 15,773 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 653 दिवसांवर गेला आहे.
पुणे शहरात आज 242 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 242 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 74 हजार 112 इतकी झाली आहे.शहरातील 388 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 62 हजार 610 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 532 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 78 हजार 773 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 27 रुग्णांपैकी 511 रुग्ण गंभीर तर 822 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 9 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 475 इतकी झाली आहे.