Maharashtra Corona Cases : राज्यात काल दिलासादायक आकडेवारी.. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
Maharashtra Corona Cases : राज्यात आज 9,798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 9,798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 56,99,983 इतकी झालीय. आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.73 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 198 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,90,78,541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,54,508 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,54,461 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 19 मृत्यूंची नोंद मुंबईत केली आहे. मुंबईत आजवर 682307 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 18,764 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 734 दिवसांवर गेला आहे.
पुणे शहरात रुग्णसंख्येत घट
पुणे शहरात आज नव्याने 280 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 75 हजार 377 इतकी झाली आहे. शहरातील 318 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 64 हजार 203 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 951 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 4 हजार 688 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 658 रुग्णांपैकी 409 रुग्ण गंभीर तर 611 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 516 इतकी झाली आहे.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार!
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.