Maharashtra Corona Cases : राज्यात बुधवारी 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात आज 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 10 हजार 567 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजपर्यंत एकूण 56,79,746 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.7 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 237 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज नोंद झालेल्या एकूण 237 मृत्यूपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 830 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 830 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1300 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,86,124 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,907 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 727 दिवसांवर गेला आहे.