औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या निर्बंधाचा फटका औरंगाबाद विमानसेवेला बसू लागला आहे. औरंगाबाद येथील सर्व पर्यटन स्थळ बंद आहेत त्यामुळे विमान सेवेला कमी प्रतिसाद मिळत नाही  आणि याच कारणाने गेल्या पंधरा दिवसात 33 विमानांचे उड्डाण रद्द झालं.  यामुळे उद्योग क्षेत्र, हॉटेल इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीला देखील याचा मोठा फटका बसत आहे.


जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठ्याच्या लेण्याच वैभव  औरंगाबाद शहराला लाभलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी अशी या शहराची ख्याती आहे. याबरोबरच औरंगाबाद शहरालागत ऑटो इंडस्ट्रीज मोठे जाळे असल्याने ऑटो हब म्हणूनही ओळखलं जातं. या औरंगाबाद शहरात इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे . आणि या विमानतळावर कधीकाळी विमानाचं ट्रॅफिक असायचं. मात्र कोरोनाच्या पहिल्या,  दुसऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांमुळे विमान प्रवासी संख्येत घट झाल्याने  काही विमान कंपन्यांनी आपल्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.


फेब्रुवारी 2020 पर्यंत औरंगाबाद विमानतळावरून रोज विमानाच्या 25 ते 30  फेऱ्या होत असत .बेंगलोर ,अहमदाबादला ही थेट विमान होती. मात्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे नंतर आता तिसऱ्या लाटेच्या निर्बंध आता केवळ सहा विमानाच्या 12 फेऱ्या होतात. त्यात शिर्डीला विमानतळ झाल्याने त्याचा फटका औरंगाबाद विमानतळ आलाही बसला आहे.


विमानाचा फेऱ्या रद्द झाल्याने सर्वात मोठा फटका बसला तो औरंगाबादेतील उद्योगक्षेत्राला . मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी, कंपन्यांच्या मालकांची ये जा विमानाने होते. शिवाय नवीन कंपनी उभारताना देखील एअर कनेक्टिव्हिटीचा विचार होतो. ऑटो इंडस्ट्री असल्यानं जपान, चीनसह इतर मोठ्या देशांना औरंगाबाद कनेक्ट होतं मात्र विमानाची कनेक्टिव्हिटी कमी झाल्याने याचा फटका उद्योग क्षेत्राला बसतो आहे.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद येथील वेरूळ, अजिंठा, बीबीचा मकबरा अशी सर्व पर्यटन क्षेत्र बंद करण्यात आलीत . त्यामुळे पर्यटक बंद झालंय सहाजिकच याचा फटका हॉटेल इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल  टुरिझमला बसत आहे.


विमान रद्द झाल्याने टॅक्सी व्यवसायावर परिणाम होतो पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटन स्थळावर अवलंबून असलेल्या लोकांना उपासमारीची वेळ येते. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगक्षेत्रातील ऑनलाईन मिटिंगचा फटका देखील विमान सेवेला बसतो आहे. त्यामुळे इंडिया कंपनीने 13 ते 31 जानेवारी दरम्यान दिल्ली, मुंबई मार्गावरील 33 विमानांचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केवळ औरंगाबाद विमानतळावरून एअर इंडियाचे विमान सुरू  असणार आहेत.


महत्वाच्या बातम्या :