IT Refunds : आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना टॅक्स रिफंड जारी केला आहे. है. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59 करोड करदात्याला 1 कोटी 54 हजार 302 रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
इनकम टॅक्सने ट्वीट करत ही माहिती दिली आहे की, 53,689 कोटी रुपयांचा रिफंड 1,56,57,444 प्रकरणांमध्ये जारी केला आहे. तर 2,21,976 प्रकरणांसाठी एक लाख कोटी रूपये (1,00,612 कोटी) पेक्षा अधिक कॉर्पोरेट टॅक्स रिफंड केला आहे. ज्यामध्ये 23,406 कोटी रुपयांचा रिफंड हा 2021-22 वर्षाकरता 1.20 कोटी प्रकरणात जारी केला आहे.
करदात्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत आपला टॅक्स भरायचा आहे. करदात्यांना आईटीआर प्रोसेसिंग झाल्यानंतर आयकर विभाग रिफंड जारी करते. 2021-22 या वर्षाकरता इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत 5.89 कोटी टॅक्सपेअर्सनी टॅक्स रिटर्नसाठी अर्ज केला आहे. दरम्यान टॅक्स रिटर्नसाठी ज्यांना ऑडिट करण्याची गरज आहे त्यां्यासाठी 15 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
31 डिसेंबर 2021 नंतर दंड भरावा लागणार
आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत नाही भरले तर तुमच्याकडे 31 डिसेंबर 2022 पर्यंत वेळ आहे. पण तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. जर तुमचा टॅक्सेबल इनकम पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. आणि जर तुमचा इनकम पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे, जर तुम्हाला दंड भरणं टाळायचं असेल, तर तुम्ही 31 डिसेंबर 2022 पूर्वी तुमचं आयटी रिटर्न भरलं पाहिजे.
संबंधित बातम्या :