Stock Market Opening : शेअर मार्केटची आज सुरुवात काहीशी संथ गतीनं झालेली दिसत आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काही कोणत्याही शेअरमध्ये वाढ दिसत नाही. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty)घसरण झाली आहे.
आज शेअर मार्केटची सुरूवात ही घसरणीनं झाली. सेन्सेक्स 421.81 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी घसरून 60,813.49 वर आला आहे. तर निफ्टी सुरूवात ही 70 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीनं झाली. निफ्टी 72 अंकांच्या घसरणीसह 18185 वर उघडला आहे.
आजच्या, निफ्टीच्या 50 पैकी केवळ 23 समभागांनी वाढीसह सुरुवात केली आहे. तसेच 25 शेअर्सच्या घसरणीसह व्यवहार होत आहेत. 2 शेअर्स कालच्या समान पातळीवर कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत. बँक निफ्टी 273.55 अंकावर म्हणजेच 0.71 टक्क्यांच्या घसरणीसह 38,196 वर व्यवहार करत आहे.
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
एचसीएल टेक 2.15 टक्के, अॅक्सिस बँक 2 टक्के आणि 1.90 टक्के असे शेअर्स घसरले आहेत. याशिवाय HDFC बँकचे शेअर्स 1.85 टक्क्यांनी आणि UPL चे 1.11 टक्क्यांनी घसरले आहेत.
शेअर मार्केटची टॉप गेनर्सची यादी-
आयओसीएल 2.60 टक्क्यांची वाढ
सिप्लाची 1.9 टक्क्यांनी तेजी
कोल इंडिया 0.73 टक्के
डीवीज लॅब्स 0.65 टक्के
सेक्टोरियल इंडेक्स पहा
आयटी सेक्टरमध्ये 0.79 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच फायनेंशियल सर्व्हिसेस आणि निफ्टी बॅंकमध्ये 0.56 टक्के घसरण झाली आहे. फार्मा, कंज्यूमर ड्यूरेबल्स आणि एफएमसीजी सेक्टरचे शेअर्स देखील घसरले आहेत.
प्री-ओपनिंगला कसे असेल मार्केट
प्री-ओपनिंगला देखील शेअर मार्केट हे संथ गतीनं चालेल. शेअर मार्केट सुरू होण्याआधी 9:10 मिनिटांनी मार्केट उघडण्यापूर्वी इंडेक्स सेंसेक्स हा 190.51 अंकांनी म्हणजेच 0.31 टक्क्यांनी घसरून 61,044.79 वर ट्रेड करत होता. NSE चा निफ्टी 72.80 अंकांच्या घसरणीसह 18185 वर होता.
महत्त्वाच्या बातम्या :