Cabayya Vihang Building Case: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीवर ठाणे महापालिकेनं (Thane Municipal Corporation) ठोठावलेला दंड आणि त्यावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. इमारतीचा दंड माफ केल्यानं सुरु झालेल्या वादावर आमदार सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर भाष्य केलंय. तसेच विहंग इमारतीचा सरकारनं सोडवलाय. याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 


नुकतीच प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ केल्यानं वादावर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करीत विहंग इमारतीचा प्रश्न सोडवल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. हे प्रकरण 2007 पासून सुरु झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. 


प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 1 येथे उभारलेल्या छाबय्या विहंग गार्डन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. आता राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन हा दंड माफ केलाय.  प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन भाजप आक्रमक झालीय. सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.  या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध केला होता तरीही राज्य सरकारनं मंत्रीमंडळ  बैठकीत निर्णय घेतला.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha