Maharashtra Corona Cases : राज्यात आज 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद
राज्यात आज 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.
![Maharashtra Corona Cases : राज्यात आज 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद maharashtra corona 5,424 cases patients discharged today 4,408 new cases in the state today Maharashtra Corona Cases : राज्यात आज 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/07/b73c2292baea49dca4acef47ada630a2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. आज 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.87टक्के आहे.
राज्यात आज 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0), धुळे (5), परभणी (41), हिंगोली (74), नांदेड (49), अमरावती (90), अकोला (30), वाशिम (5), बुलढाणा (45), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (2), चंद्रपूर (94) गडचिरोली (29) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर, धुळे, जळगाव महानगरपालिका परभणी, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया , चंद्रपूर या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 821 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 12,91, 383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,01, 213 (12.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,53,807 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 233 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 198 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 198 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 304 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,640 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1986 दिवसांवर गेला आहे.
5 महिन्यानंतर देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद
भारतात कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाच महिन्यांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 437 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 15 मार्च रोजी 24,492 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच देशभरात गेल्या 24 तासांत 36,830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)