CM Uddhav Thackeray Live : काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Speech Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरुनही अनेक शिवसैनिक सभास्थळी आले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 May 2022 09:08 PM
Uddhav Thackeray : आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे :  उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : श्रीलंका परत का पेटली याचा विचार करा.  मध्ये कोणी तरी सांगितलं, मोदीजींनी धान्य फुकट दिलं. अरे कच्च खाणार का? ते शिजवायच कसं? गॅसच्या किंमती पहा. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणार नाही, अख्ख घर पेटलं तरी चुल पेटत नाही, आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे :  उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : महाराष्ट्र मेल्या आईच दुध प्यायलेला नाही :  उद्धव ठाकरे 

 Uddhav Thackeray : महाराष्ट्र मेल्या आईच दुध प्यायलेला नाही. समोरुन वार करा परंतु खोटीनाटी गलिच्छ विकृत राजकारण बंद करा. आता तरी सुधरा   :  उद्धव ठाकरे 

छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत  :  उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray on Marathi Bhasha :  छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत, असे करंटे सरकार तिथे बसलं आहे. पुरातत्व खात तेच जे औरंगजेबाची कबर राखतं, तिथे कबर राखतात आणि मंदीरांच्या जीर्णोद्धारास नकार देतात. देवेंद्रजी तिकडे जाऊन  विरोध करा, असे अनेक प्रकल्प आहेत जिथे केंद्राने अडवणूक केली आहे.  :  उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray on Raj Thackeray : काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray on Raj Thackeray : मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे.

कोणी मायेचा पुत या महाराष्ट्रात भगव्याला हात घालु शकणार नाही : उद्धव ठाकरे

आम्हीं कधी तुमच्या कुटुंबाची निंदानालस्ती केली का? भ्रष्टाचाराची एक एक प्रकरण आता यांची बाहेर येत आहेत. एकतर्फी प्रेम आहे, आणि या प्रेमातुन महाराष्ट्राला विद्रुप करण्याचे काम सुरू आहे. कोणी मायेचा पुत या महाराष्ट्रात भगव्याला हात घालु शकणार नाही : उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला बदनाम करत आहेत :  उद्धव ठाकरे 

तुमच्या गो कोरोना गो च्या थाळ्या अजुन रिकाम्या आहेत.  आम्हीं शिवभोजनातुन भरलेली थाळी देतो. मग आता 'गो महागाई गो' म्हणून देखील वाजवा थाळ्या. हे सर्व पाहुन उद्वेग होतो, की हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. जणु काही चरस गांजाची शेती करत आहेत. काढा दोन वर्षातील सर्व केसेस :  उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray : दाऊद गुणाचा पुतळा आहे. : उद्धव ठाकरे

जर दाऊद बोलला की भाजप मध्ये येतो, तर त्याला मंत्री देखील करतील. नंतर म्हणतील, तस काही नाही हो, दाऊद गुणाचा पुतळा आहे  : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Live : पालिका शाळेत प्रवेशासाठी रांगा लागत आहेत : उद्धव ठाकरे

मुंबईमध्ये जी काम आपण करतो, ती आपण अभिमानाने सांगितली पाहिजेत. सीबीएसई सारख्या बोर्डचे शिक्षण पालिका शाळांत दिले जाते. पूर्वी पालिकेच्या शाळांत जातो सांगायला थोडी लाज वाटत असे, आता जाऊन पहा,  प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Rally Live : विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही : उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray Rally Live : तुमच विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही.  हिंदुहृदयसम्राटांनी विचार दिला, तुम्हीं विखार पसरवत आहात. असे विखारी, विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही. हे सर्व मनोरुग्ण आहेत.

Uddhav Thackeray Speech Live : हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं : उद्धव ठाकरे

 Uddhav Thackeray Speech Live :  गेल्यावेळेस त्यांनी भगव्या टोप्या घातल्या. विचारलं की का घातली, तर म्हणे हिंदुत्व ना. अरे हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, मेंदुत असतं. या गर्दीमध्ये जीवंतपणा आहे. सर्व वाघ आहेत वाघ.  : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on  Fadnavis : देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on  Fadnavis :  हनुमान  चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय  धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही उघडपणे राष्ट्रवादी आणि शिवेसेनेसोबत गेलो.  : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Hindutva : कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Hindutva : हनुमान  चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय  धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही

शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींचा आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray Rally : गेल्या 25 वर्षात आम्ही देखील सडलो. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आता आम्ही पाहत आहे. सामनात जे छापून येते ते जनतेच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे असते. भाजप जी भाषा वापरते तसं आम्ही बोलत नाही. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते आमच्या नाही. आत्ताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींची का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

Uddhav Thackeray :  स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान नाही : : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Sangha : संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी?  स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान नाहीत.  संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं तर यांचे बाप म्हणजे संघ... तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे 

Uddhav Thackeray on Mumbai : मुंबईचा लचका तोडणा-यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Mumbai : मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर   तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत   : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Rally Live : भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी  : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Rally Live : बऱ्याच दिवसानी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे.  भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होते. आता आम्ही त्या गाढवांना सोडले आहे.  : उद्धव ठाकरे

Sanjay Raut : ओवैसींकडून महाराष्ट्राचा अपमान  : संजय राऊत

Sanjay Raut : ओवैसींकडून महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. ओवेसी महाराष्ट्रात 2014 पासून येत आहे. गेली पाच वर्षे कबरीसमोर झुकत आहे. आतापर्यंत 20 वेळा कबरीसमोर गेला आहे  शिवसेनेकडे बोट दाखवू नका, बोट छाटली जातील : संजय राऊत

Sanjay Raut : मुंबईचा बाप ही शिवसेना : संजय राऊत

Sanjay Raut : खऱ्या तोफा काय असतात हे आज महाराष्ट्राला दिसणार आहे. आजची सभा एकच सांगते की मुंबईचा बाप ही शिवसेना आहे. : संजय राऊत

Aaditya Thackeray :  आजच्या सभेत जोरदार बॅटिंग  होणार  : आदित्य ठाकरे 

Aaditya Thackeray :  अनेक वर्षांपासून शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा हे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण झाले. आजच्या सभेत जोरदार बॅटिंग  होणार आहे. पक्षप्रमुख आज अनेकांचा मास्क उतरवणार आहे  : आदित्य ठाकरे 

Aaditya Thackeray : शिवसैनिकांमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे दिसत आहे : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray :  सभेला आलेल्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये माझे आजोबा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आजी दिसत आहे. 

Uddhav Thackeray Rally Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल

Uddhav Thackeray Rally Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाले असून थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे. 

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे सभास्थळाकडे रवाना

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे सभास्थळाकडे रवाना झाला आहे

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेन वर ही वाहतूक कोंडी झाली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला येणाऱ्या अनेक बस वाहन ही या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या आहेत.  घोडबंदर ब्रिज ते वसई हद्दीत बाफणे असा 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे.

Uddhav Thackeray Speech : कल्याण डोंबिवली शहरातून 100 हून अधिक बस मुंबईकडे रवाना

Uddhav Thackeray Speech Today :  गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे राज्य नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे .मुंबईतील कल्याण डोंबिवलीमध्ये  सभेसाठी जय्यत तयारी करण्यात ठिक ठिकाणी सभेचे होर्डिंग लावण्यात आले होते. शाखा स्तरावर बैठका घेण्यात आल्या होत्या . या सभेसाठी कल्याण डोंबिवली मधून देखील या सभेसाठी हजारो शिवसैनिक निघाले आहेत कल्याण डोंबिवली शहरातून 100 हून अधिक बस मुंबईकडे रवाना झालं हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले  

Uddhav Thackeray Rally : सभेनंतर शिवसैनिकांना वाहतूक कोंडीला सामना करावा लागेल

Uddhav Thackeray Rally : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला बीकेसीमध्ये येणाऱ्या शिवसैनिकांना माघारी फिरताना मात्र मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. कारण पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर जंक्शनचा असलेला पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील दहा दिवस हा पूल पूर्णपणे वाहतुकीस बंद असणार आहे. या मुळे या मार्गावर सकाळपासून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणत खोळंबा झाला आहे.अगदी घाटकोपर पासून कांजूरमार्ग पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मुंबई पूर्व उपनगरातून शिवसैनिक सभेला तर वेळेत पोहचतील. मात्र माघारी फिरल्यावर त्यांना काही तास या वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची शक्यता आहे.

Anil Desai : आम्ही कोणाला उत्तर द्यायला सभा घेत नाही : अनिल देसाई

Anil Desai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगामी काळात महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आम्ही कोणाला उत्तर द्यायला सभा घेत नाही.  आम्हाला उत्तरं द्यायची गरज नाही.  आमच्या हिदुत्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊच शकत नाही बाबरीपासून हिदुत्व काय आहे ते माहित आहे. ज्यांनी घाणेरडे राजकारण केलं आणि आमच्या टीका केली त्यांना उत्तर देणारं  आम्ही हिदुत्वाच्या मुद्दयांवर ट्रिजर ट्रेलर लॅान्ज केले आहेत

Chandrabhaga Aaji : शिवसेनेच्या फायर ब्रॅंड चंद्रभागा आजी आज सभेला उपस्थित राहणार

Chandrabhaga Aaji : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजकीय सभा पार पडेल. अशात मुख्यमंत्र्यांकडून राणा दाम्पत्यांना उत्तर देण्याची शक्यता आहे.  मातोश्री समोर राणा दाम्पत्यांसाठी उभ्या ठाकलेल्या शिवसेनेच्या फायर ब्रॅंड आजी यांनी देखील राजकीय सभेवर भाष्य केलंय. मुख्यमंत्री आज सर्वांना उत्तर देखील, राणा यांना देखील उत्तर देतील असं त्या म्हणाल्या. सोबतच मंत्रीपद आल्यापासून उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जात असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केलीय. आजी देखील आज सभेला उपस्थित राहणार आहे.

Uddhav Thackeray Speech : शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला पालघरमधून शिवसैनिक रवाना

Uddhav Thackeray Speech : शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला पालघरमधून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रवाना होत आहेत. जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने शिवसैनिक हे मुंबईकडे रवाना झालेत . पालघर जिल्ह्यातील पालघर बोईसर मनोर या भागातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सभेला उपस्थित राहणार आहेत.

BKC Mumbai : आजच्या सभेसाठी शिवसेनेने स्वयंसेवक

ShivSainik : बीकेसी येथील सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल होणार आहेत. आजच्या सभेसाठी शिवसेनेने स्वयंसेवक तयार केले आहेत. पिवळे टीशर्ट घालून  मुंबईच्या विविध शाखेतून आलेले  शिवसैनिक येठे स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे आणि या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण-कोण असतील याची चर्चा सुरु झाली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून महिनाभर सुरु असलेला वाद, हिंदुत्वावरून सुरु असलेली लढाई, भाजपकडून होणारे आरोप प्रत्यारोप आणि राणा दाम्पत्यानं दिलेलं आव्हान..... या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या सभेत घेतील असे संकेत शिवसेनेनं आतापर्यंत जारी केलेल्या जाहिरातींमधून मिळाले आहेत. याशिवाय ओवैशींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 मुंबईतल्या बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं  आज सभा होणार आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीय. त्यामुळे या सभेत मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.  दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. 


उद्धव ठाकरेंच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील? 



  •  राज ठाकरे 

  • देवेंद्र फडणवीस 

  • नवनीत राणा आणि रवी राणा

  •  केंद्र सरकार 

  •  महागाई 

  •  केंद्रीय यंत्रणा 

  • आगामी निवडणुका 


मुंबईतल्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती मिळाली आहे. कोरोनानंतर प्रथमच मुंबईच्या बाहेर जात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. ते महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत. यात ते शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.


संबंधित बातम्या :


CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या BKCवरील आजच्या सभेची जय्यत तयारी; वाहतूक मार्गात मोठे बदल


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.