Nashik Rain News :  नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहे. नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकात पाणी साचल्याने संपूर्ण कांदा शेतात सडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर जास्त पावसाने शेडमध्ये असलेली शिमला मिरची पिक खराब होऊन शेतकर्‍याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये झालेल्या पावसात बाजार समितीमधील खळ्यात पावसाचे पाणी सचल्यानं कांदा गोण्यासह भिजला आहे. तर काही प्रमाणात कांदा अक्षरक्ष: वाहून गेला आहे. शेतीत भाजीपाला आणि बाजार समिती मधील कांदाचे मोठं नुकसान झाल्याने बळीराजाचे स्वप्न भंगल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जातेय.  

सिन्नर तालुक्यातील देवनदीची पाणी पातळी वाढली 

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान या पावसामुळे सिन्नर बस स्थानकाच्या प्लँटफॉर्मच्या छताचा काही भाग शिवशाही बस आणि चारचाकी वर कोसळला. दरम्यान, बसमधील प्रवाश्यांनी प्रसंगावधन राखून बाहेर पडल्यानं सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रविवार असल्यानं प्रवाशांची गर्दीही तुलनेने कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाय. मात्र मागील दहा वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या बसस्थानकचा भाग कोसळल्याने कामच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. तर तिकडे सिन्नर तालुक्यातील इतर भागांत ही जोरदार पासून सुरू असून अनेक नागरिकांच्या घरात पानी शिरल्याच्या घटना घडल्या आहे. तर रस्ते झाले जलमय झाले आहे. दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील देवनदीची पाणी पातळी वाढली आहे. 

उन्हाळ्यात कोरडी पडलीली मलंगगड नदी झाली प्रवाही 

पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातल्या नदीला मोठ्या प्रमाणात आज जलप्रवाह आला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात हीच नदी कोरडी पडली होती. मात्र मागील काही दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि आज सकाळपासून सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे ही नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता या परिसरात शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या