(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur News : होणाऱ्या नवऱ्याने लग्नास दिला नकार, तरुणीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या
Chandrapur News : ब्रम्हपुरीत राहणाऱ्या तरुणासोबत दीड वर्ष आधीच तिचा साखरपुडा झाला होता. न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
Chandrapur News : वाग्दत्त वराने म्हणजे होणाऱ्या नवऱ्याने (Future Husband Refused Marriage) लग्नास नकार दिल्याने एका तरुणीने त्याच्याच कार्यालयासमोर गळफास (Girl committed suicide) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
दीड वर्ष आधीच साखरपुडा झाला होता
ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर आज सकाळी एका तरुणीने गळफास घेतलेले आढळून आले. मंगळवारी पहाटे पौर्णिमा मिलिंद लाडे या 27 वर्षीय मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. ही तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या कोरेगाव (चोप) येथील रहिवाशी असून, सचिन शेंडे या ब्रम्हपुरीत राहणाऱ्या तरुणासोबत दीड वर्ष आधीच तिचा साखरपुडा झाला होता. सचिन हा ब्रम्हपुरी च्या दिवाणी न्यायालयात चपराशी पदावर कार्यरत आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
साखरपुडा झाल्यानंतरही होणारा नवरा लग्नास टाळाटाळ करत असल्याने मुलीने टोकाचे पाऊल उचलले आणि त्याच्याच कार्यालयाच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारी वरून सचिन शेंडे वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना (Police) दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
सामान्य नागरिकांची घटनास्थळी गर्दी
मात्र ब्रम्हपुरीमधील दिवाणी न्यायालयाच्या अगदी प्रवेश द्वारावर मृतदेह आढल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक आणि पोलीस यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी घटनास्थळी झाली होती.
औरंगाबादमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
औरंगाबादच्या पैठण शहरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. बायोकाच्या डोक्यात फावड्याने मारहाण करून पत्नीला जागीच संपवून पती फरार झाला आहे. काल सकाळी सात वाजता ही घटना समोर आली असून, घटनास्थळी पैठण पोलीस दाखल झाले आहेत. त्यामुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून, मंदा पुंडलिक पौळ असे मृत महिलेच नाव आहे.
हेही वाचा