एक्स्प्लोर
दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार, खडसे येणार का? मुख्यमंत्री म्हणतात...
दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात सांगितलं.

सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं भाष्य केलं. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात सांगितलं. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का, या प्रश्नावर मात्र मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल हे विस्तारानंतरच कळेल, असं नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी खडसेंबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं असलं, तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महामंत्री रामलाल यांच्यात चर्चा झाली. चार तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार, शिवसेनेला सत्तेतील वाटा, खडसेंचं पुनर्वसन यावर चर्चा झाल्याची शक्यता होती. सध्या भाजप शिवसेनेमधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आठ-दहा महिन्यांसाठी मंत्रिपदं? दरम्यान, राज्य सरकारला सत्तेत येऊन 31 ऑक्टोबरला चार वर्षे पूर्ण होत आहेत. यापूर्वी अनेक वेळा केवळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाच झाल्या, मात्र प्रत्यक्षात तो झालाच नाही. चार वर्षात मंत्रिपदं मिळाली नाहीत, त्यामुळे शेवटच्या वर्षात तरी मंत्रिपद मिळेल अशी आशा शिवसेनेतील अनेक आमदारांना आहे. त्यावरुनच सेनेत वादावादी सुरु झाली आहे. दुसरीकडे येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातील निवडणुकांच्या घोषणा होतील. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही सुरु होईल. त्यामुळे विस्तारानंतर 7-8 महिन्यांसाठी मंत्रिपदं मिळतील. मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, असं यापूर्वीच सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याच्या आरोपावरुन दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना एसीबीने दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे. संबंधित बातम्या मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे बाजारात तुरी... मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेत वाद विस्तारात अनेकांना सुखद धक्का; शिंदेंचं प्रमोशन, जानकरांची स्वप्नपूर्ती राज्यातल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या घडामोडींना वेग, मुख्यमंत्री आणि दानवे अमित शाहांच्या भेटीला 10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खडसेंचं कमबॅक गुलदस्त्यात
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























