एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीत मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 4 निर्णय!
![शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीत मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 4 निर्णय! Maharashtra Cabinate Decisions शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीत मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 4 निर्णय!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/05060849/Mantralay1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: शिवसेना मंत्र्यांच्या अनुपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी मारली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत बैठकीला गैरहजर राहिले.
मात्र तरीही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६ - २०१७ मध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्याकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रति क्विंटल १० रुपये भरडाई दराव्यतिरिक्त प्रति क्विंटल ३० रुपये वाढीव भरडाई दर राज्य शासनाकडून मंजूर.
- राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील दंतशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक, दंतशल्यचिकित्सक या पदांवर विभागीय निवड मंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास मंजुरी
- राज्याचे महाअधिवक्ता या पदावर आशुतोष कुंभकोणी यांच्या नियुक्तीची राज्यपालांना शिफारस करण्यास मान्यता.
- उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यांसाठी उमरेड (जि. नागपूर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यास मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)