Budget Session : विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय
Maharashtra Budget Session : आजच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले आहेत.
Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. आजच्या (23 मार्च) दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. येत्या 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, आजही विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव देखील येणार आहे.
2019 नंतर प्रथमच एकत्र
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत फारकत घेतली होती. भाजपसोबत जाण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. यावरुन दोन्ही पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर यामागचे कलाकार देवेंद्र फडणवीस असल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ऐकमेकांवर टीका केली होती.
आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती
आज विधीमंडळात दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची एकत्र एन्ट्री झाल्यानं सगळ्यांच्या नजरा या दोन्ही नेत्यांकडे लागल्या होत्या. सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोब आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis Uddhav Thackeray at Vidhansabha : ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री
महत्त्वाच्या बातम्या: