Maharashtra Budget 2022 LIVE : 24 हजार 353 कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प

Maharashtra Budget Session 2022 LIVE Updates: अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, कृषी क्षेत्रात 4.4 टक्के, उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढीचा अंदाज, कोणत्या क्षेत्राला काय मिळणार?

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Mar 2022 04:48 PM
Maharashtra Budget 2022 LIVE : शिक्षणसंबंधित क्षेत्रासाठी अजित पवारांनी नेमक्या काय काय घोषणा केल्या...

  • उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद

  • शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद

  • मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी 

  • सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद

  • क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद

Maharashtra Budget 2022 LIVE : पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद?

  • कोयना,जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित 

  • जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा,वेरूळ,महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुव‍िधा निर्माण करण्यासाठी अनुदान

  • पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय “महावारसा सोसायटीची स्थापना

  • बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात "आफ्रिकन सफारी" सुरु करणार

  • पुणे वन विभागात  बिबट्या सफारी सुरु करणार

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थसंकल्पामध्ये उद्योग क्षेत्रासाठी काय तरतूद?

  • मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत  98 गुंतवणूक करारातून      189000 हजार कोटी रूपये  गुंतवणूक आणि रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन  संधी 

  • ई-वाहन धोरणांतर्गत सन 2025 पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्द‍ीष्ट. 5000 चार्जिंग सुविधा उभारणार

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30,000 अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगार संधी 

  • कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना

  • मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि.लातूर), मौजे साक्री (जि.धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ  येथे एकूण 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क

  • मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी 11530 कोटी रुपयाचे 5 प्रकल्प

Maharashtra Budget 2022 LIVE : अजितदादांच्या सुटकेसमधून शिक्षणक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23  या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. गेल्या काही काळापासून कोरोनामुळं शिक्षणक्षेत्रावर मोठे निर्बंध आले आहेत. शिक्षणक्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

> हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.

> शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

> नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

> दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

> कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली. 

> पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

> जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

> भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.  

> शेततळ्यासाठी अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आता 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.  

> देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार

> प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प

> या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार

> एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं

> मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी 

Maharashtra Budget 2022 LIVE : महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?

Maharashtra Budget 2022 LIVE : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतरचा हा अर्थसंकल्पअसल्याने मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.  भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थसंकल्पातील दहा महत्त्वाच्या घोषणा काय?

  • हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील

  • जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद

  • मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार

  • तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार

  • आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार 8 कोटींची तरतूद

  • आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार

  • मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी

  • 15 हजार 773 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधण्यासाठी तर इमारत बांधण्यासाठी 1 हजार कोटी

  • एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत

  • महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार

Maharashtra Budget 2022 LIVE : 'निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई', अर्थमंत्री अजित पवारांचा शायराना अंदाज

महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23  या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. बजेट मांडताना अजितदादांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. 

निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई
दिला शब्द राज्याला की, धैर्याने जिंकू लढाई
लढाई लढताना विजयाची जागवली आशा
देशाने पाहिले अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा

असं म्हणत अजित पवारांनी आपण करत असलेल्या कामांची दिशा स्पष्ट केली. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून 250 कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Budget 2022 LIVE : कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कार्याचा सगळ्यांनीच कौतुक केलं : उपमुख्यमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कार्याचा सगळ्यांनीच कौतुक केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी सरकारची कामगिरी त्यांनी शायरीतून व्यक्त केली.

निष्ठेने केली सेवा ना केली कधी बढाई, दिला शब्द राज्याला, धैर्याने जिंकू लढाई

लढाई लढतानाही विजयाची जागवली आशा, देशाने पाहिलं अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थसंकल्पातून आरोग्य विभागासाठी काय मिळालं?

  • 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने - 8 कोटी खर्च

  • नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी भांडवली खर्चासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी

  • सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला रुग्णालये - हिंगोली, यवतमाळ, सांगली, सातारा, धुळे, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारणार 

  • ग्रामीण भागातील रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देणार, 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन वर्षात सुरु करणार, त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद

  • 60 शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची उपचारपद्धती

  • आनंदीबाई जोशी यांना स्मरुण देशातील होतकरु विद्यार्थ्यांना इथेच प्रवेश मिळावा. मुंबईत सेंट जॉर्ज, नाशिक आरोग्य विज्ञान संस्था, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर संस्था उभारणार 

  • पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार 

  • नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन टेक्नॉलॉजी- राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार

  • जालना इथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे, या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढे ही सेवा उपजिल्हा रुग्णालयातही उपलब्ध होईल.  

Maharashtra Budget 2022 LIVE : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूदी?

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यामध्ये त्यांनी कृषी संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाची घोषणा म्हणजे भुविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थमंत्र्यांनी परिवहन वाहतूक व्यवस्थेसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

> मुंबई-पुणे समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

> गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी केली. 

>  मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू 2023 च्या अखेरीस सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केली. 

> एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

> शिर्डी विमानतळाला 150 कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद

> मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले. 

> पर्यावरण पूरक 3 हजार बस सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. 

> राज्यात ई-वाहनांसाठी 5000 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे

> मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले

> परिवहन विभागाला 3 हजार 303 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.  

> पुणे रिंग रोडसाठी  1500 कोटींचा निधी प्रस्तावित

> मुंबई-हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. 

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विविध विभागांसाठीची तरतूद केली. अजित पवार यांनी राज्यात परिवहन, वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा गडचिरोली, गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार असून मुंबईला जलवाहतुकीशी जोडण्यासाठीच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Budget 2022 LIVE : विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी 

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी 

CM Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2022 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे, विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल : मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2022 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे, विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबई, पुणे, नागपूरमध्ये स्वातंत्र्यलढा हेरिटेज वॉक सुरु करणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबई, पुणे, नागपूरमध्ये स्वातंत्र्यलढा हेरिटेज वॉक सुरु करणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद

Maharashtra Budget 2022 LIVE : महाबळेश्वर, अजिंठा, वेरुळचा सर्वांगिण विकास करणार, सुविधा केंद्र सुरु करणार : अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : महाबळेश्वर, अजिंठा, वेरुळचा सर्वांगिण विकास करणार, सुविधा केंद्र सुरु करणार, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : पुण्यातील फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Budget 2022 LIVE :  पुण्यातील फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Budget 2022 LIVE : गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव

Maharashtra Budget 2022 LIVE : गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव, शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटींचा निधी, रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींची निधी, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी?

Maharashtra Budget 2022 LIVE : महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 472 कोटी : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 472 कोटी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : सामाजिक न्याय विभागाला 2 हजार 876 कोटी रुपये : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : सामाजिक न्याय विभागाला 2 हजार 876 कोटी रुपये : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी

Maharashtra Budget 2022 LIVE : आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : क्रीडा विभागासाठी 354 कोटींचा निधी

Maharashtra Budget 2022 LIVE : क्रीडा विभागासाठी 354 कोटींचा निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्यातील तृतीयपंथियांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्यातील तृतीयपंथियांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन रुग्णालय उभारणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन रुग्णालय उभारणार, 3 हजार 183 कोटींचा निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगडमधील खानापूर जमीन देणार : अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगडमधील खानापूर जमीन देणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : 8 कोटी रुपयांची 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनं पुरवणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : 8 कोटी रुपयांची 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनं पुरवणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : 15 लाख 87 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस दिला : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : 15 लाख 87 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस दिला : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : यंदाच्या वर्षात 60 हजार कृषी पंपांना वीज देणार, 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचं लक्ष्य : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : यंदाच्या वर्षात 60 हजार कृषी पंपांना वीज देणार, 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचं लक्ष्य : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटींची तरतूद : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटींची तरतूद : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ, अन्न प्रक्रिया योजना राबवणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ, अन्न प्रक्रिया योजना राबवणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार ऐवजी आता 75 हजार रुपयांचं अनुदान : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार ऐवजी आता 75 हजार रुपयांचं अनुदान : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : येत्या 2 वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेलीमध्ये उभारणार, 250 कोटीची तरतूद

Maharashtra Budget 2022 LIVE : संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेलीमध्ये उभारणार, 250 कोटीची तरतूद 

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर

राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. अर्थमंत्री अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर 

पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासात आघाडीवर - सुप्रिया सुळेंचं ट्वीट

पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासात आघाडीवर - सुप्रिया सुळेंचं ट्वीट

Maharashtra Budget 2022 : महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उपस्थित, आदिवासी जमिनीच्या मुद्द्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उपस्थित, आदिवासी जमिनीच्या मुद्द्यांवर विरोधकांची घोषणाबाजी, अजित पवार विधानभवनात पोहचत आहेत

Maharashtra Budget 2022 : आज राज्याचा अर्थसंकल्प, अर्थमंत्री अजित पवार काय घोषणा करणार याकडे लक्ष

Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पात आज कोणत्या नव्या घोषणा होणार? ABP Majha

Maharashtra Budget Session 2022 : मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केल्या होत्या?

  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा

  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित

  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल

  • प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार

  • शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान

Maharashtra Budget Session 2022 : मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी काय घोषणा केल्या होत्या?

आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल
महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये यावर्षी
कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150 रूग्णालयांमध्ये सुविधा
सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार
सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी 29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1 हजार 941 कोटी 64 लाख रुपये तरतूद

Maharashtra Budget Session 2022 : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Maharashtra Budget Session 2022 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतरचा हा अर्थसंकल्प असल्याने मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. मागील दोन अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट होते. कोरोनाचा मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागले आहे. 

Maharashtra Budget 2022 : उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी, राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर

Maharashtra Budget 2022 : अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 

अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्य सरकारने नोव्हेंबर 2021 पर्यंत 15 लाख 09 हजार 811 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 21 हजार 216 औद्योगिक प्रकल्प मंजूर केले. तसेच नोव्हेंबर 2021 पर्यंत 74 हजार 368 कोटी रुपयांच्या 258 प्रकल्पांची नोंदणी, सप्टेंबर 2021 अखेर राज्यात 9 लाख 59 हजार 746 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे या अहवालात सांगणायत आले आहे. 

Maharashtra Budget 2022 : आज राज्याचा अर्थसंकल्प, दुपारी 2 वाजता सादर होणार

Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Budget Session 2022 LIVE Updates : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी, राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर

अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 

अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्य सरकारने नोव्हेंबर 2021 पर्यंत 15 लाख 09 हजार 811 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 21 हजार 216 औद्योगिक प्रकल्प मंजूर केले. तसेच नोव्हेंबर 2021 पर्यंत 74 हजार 368 कोटी रुपयांच्या 258 प्रकल्पांची नोंदणी, सप्टेंबर 2021 अखेर राज्यात 9 लाख 59 हजार 746 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे या अहवालात सांगणायत आले आहे. 

दरम्यान, 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला म्हणजेच, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले आहेत. अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. अशातच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.