India Women vs Australia Women : भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठीचा संघ बीसीसीआयने आधीच जाहीर केला होता. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली होती, मात्र आता या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टिका भाटिया दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेली आहे.


यास्तिका भाटियाला महिला बिग बॅश लीगमध्ये मनगटाला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने याला दुजोरा दिला आहे. आता तिच्या पुनर्प्राप्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महिला निवड समितीने तिच्या जागी उमा छेत्रीचा संघात समावेश केला आहे. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.






यास्तिका भाटियापेक्षा उमा छेत्री कमी अनुभवी आहे. 22 वर्षीय उमाने यावर्षी टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघासाठी केवळ 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 9 धावा केल्या आहेत. दुसरीकडे भाटियाने संघासाठी 19 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 214 धावा केल्या आहेत. मात्र, उमाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे अवघड आहे, कारण टीम इंडियाकडे ऋचा घोषच्या रूपाने यष्टिरक्षक आहे.


भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यातील पहिला आणि दुसरा वनडे सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 11 डिसेंबर रोजी पर्थ येथे होणार आहे. तिन्ही एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9.50 वाजता सुरू होतील.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक


पहिली वनडे: 5 डिसेंबर, ब्रिस्बेन
दुसरी वनडे : 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरी वनडे : 11 डिसेंबर, पर्थ


तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतस साधू, अरुंधती रेड्डी रेणुका सिंग, सायमा ठाकोर, उमा छेत्री (यष्टीरक्षक).


हे ही वाचा -


Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!


Champions Trophy 2025 : ICC ने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम; चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलनं करा, थेट आदेश दिला...