Maharashtra Budget 2024 Live Updates : बुलेट ट्रेनचं भूसंपादन पूर्ण, 7 हजार किमी रस्ता बांधणार, बजेटमधील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget Session 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांकडून (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
LIVE
Background
Maharashtra Budget 2024 Live Updates : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांकडून (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता सादर करुन भाषण सुरु केलं.
Ajit Pawar Budget speech LIVE : अजित पवार यांचं बजेट भाषण
Uddhav Thackeray on Budget : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प
महायुती सरकारने आज मांडलेलं बजेट म्हणजे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असं आहे. नवीन रस्त्याच्या घोषणा, पहिल्या घोषणाचे काय असा प्रश्न आहे. मराठी भाषा भावनांचा आम्ही उल्लेख केला तोच आहे. पुढच पाठ मागच सपाट, अशी सरकारची अवस्था आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Maharashtra News : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक धोरणांची अंमलबजावणी
Maharashtra Interim Budget 2024 : राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक धोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर देण्यात आली आहे. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत आज सादर करण्यात आला.
Maharashtra Budget 2024 : दिव्यांगांसाठी 34 हजार घरकुल, अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार
- ३४ हजार घरकुल दिव्यांगासाठी बांधली जाणआर
- नागपुरमध्ये राज्य क्रीडा संकुलाचा नाहीदर्जा करण्यात आला आहे
- राज्यात ५० पर्यटन ठिकाणची निवड करण्यात आली आहे
- लोणावळा या ठिकाणी स्काय वॉक प्रकल्प उभारला जाईल
- आयोध्या आणि जम्मू काश्मीर या ठिरणी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे
- यासाठी मोक्याची जागा घेण्यात आली आहे
- वढू येथील स्मारकाला पावनेतिनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत
- दिल्ली , गोवा आणि बेळगाव या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारल जाणार
अयोध्येत रामजन्मभूमीत महाराष्ट्र भवन उभारणार, अजित पवारांची बजेटमध्ये घोषणा
अयोध्येत रामजन्मभूमीत महाराष्ट्र भवन उभारणार, अजित पवारांची बजेटमध्ये घोषणा
Ajit Pawar budget : प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका
प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेत १००० वरुन १५०० पेन्शन दिली जाणार.
संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन केलं जईल